नाशिक

भूत बंगला आकर्षण

CD
धुळे : टुडे पान ३ साठी... -- फोटो क्रमांक : 30221 फागणे (ता. धुळे) : साई मित्र मंडळाची विलोभनीय गणेश मूर्ती. -- फागणे गणेशोत्सवात भूत बंगला आकर्षण -- साई मित्र मंडळाचा थरारक उपक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २१ : फागणे (ता. धुळे) येथे साई मित्र मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवाचे १८ वे वर्ष उत्साहात साजरे केले जात आहे. दरवर्षी सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक व अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित उपक्रम राबवणाऱ्या या मंडळाने यंदा चित्तथरारक ‘भूत बंगला’ आरास उभारली आहे. गावात प्रथमच असा उपक्रम साकारल्याने हा भूत बंगला नागरिकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, तो पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या आरासचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बाहेरील कोणत्याही व्यावसायिक डेकोरेटर अथवा आर्टिस्टची मदत न घेता मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून व मेहनतीतून हे डेकोरेशन पूर्ण केले आहे. या भूत बंगल्यात सहा थरारक खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक साऊंड सिस्टीमद्वारे चित्र-विचित्र आवाज, प्रकाशयोजना आणि भुतांचे भीतीदायक चेहरे दाखवून भाविकांचे मनोरंजन केले जात आहे. पहिल्या दिवसापासूनच फागणे व परिसरातील नागरिकांची आरास पाहण्यासाठी रांगा लागत आहेत. आत प्रवेश केल्यानंतर मिळणारा थरारक व मनोरंजक अनुभव घेऊन बाहेर पडणारे नागरिक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत आहेत.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT