धुळे : टुडे पान ३ साठी...
--
फोटो क्रमांक : 30224
कासारे : श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळातर्फे झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात तपासणी करताना डॉ. गणेश सोनवणे. शेजारी ग्रामस्थ.
--
गणेशोत्सवनिमित्त कासारेत
आरोग्य तपासणी शिबिर
--
शिबिरासह उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची शपथ
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. २१ : कासारे (ता. साक्री) येथील श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळाच्या वतीने साक्रीस्थित श्री साई ॲक्सिडेंट हॉस्पिटल साक्री अंतर्गत नुकतेच सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कासारे आणि काटवान परिसरातील नागरिकांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर तसेच इतर आवश्यक रक्त तपासण्या करण्यात आल्या. श्री साई ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे डॉ. राहुल देवरे आणि कासारेस्थित धनदाई क्लिनिकचे डॉ. गणेश सोनवणे यांनी नागरिकांची तपासणी करून मार्गदर्शन केले. या शिबिराचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. तसेच, शिबिरादरम्यान उपस्थितांना पर्यावरणातील बदलांची माहिती देऊन पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष महेश शिंदे, उपाध्यक्ष जयदीप देसले, खजिनदार आनंद बेडसे, ग्रामपंचायत सदस्य भटू जगताप, माजी उपसरपंच निंबा देसले, गोकुळ बेडसे, मनोहर देवरे, संजय देवरे, राजेंद्र शिंदे, प्रदीप देसले, बापू भदाणे, स्वप्नील अहिरराव, मुन्ना निकम, राजेंद्र देसले, चेतन खैरनार, आशिष देसले, श्रावण जाधव, विशाल जगताप, सोनू देसले, नाना खैरनार आणि अभिजित देसले यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.