नाशिक

टुडे पान ३ साठी...अवतीभवती

CD
धुळे : टुडे पान ३ साठी...अवतीभवती -- फोटो क्रमांक : 30227 मोराणे (ता. धुळे) : इच्छापूर्ती गणपती मंदिरात पदयात्रा पूर्ण करणाऱ्या कार्यकर्त्यांसह आमदार राम भदाणे. -- नेत्याच्या विजयासाठी कार्यकर्त्यांची पदयात्रा धुळे : धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या विजयासाठी गोताणे (ता. धुळे) येथील पाच तरुणांनी गोताणे ते उज्जैन अशी ३५० किलोमीटरची अनवाणी पदयात्रा पूर्ण केली. आमदार निवडून आल्यानंतर या तरुणांनी इच्छापूर्ती गणपती मंदिरात नवसपूर्ती केली. गणेशोत्सवानिमित्त गोताणे येथे पदयात्रींचा सत्कार व महाप्रसाद सोहळा पार पडला. यात श्रीराम मासुळे, नंदलाल हाके, गुलाब मासुळे, स्वप्निल मासुळे (सर्व रा. गोताणे) आणि सुधाकर बागले (रा. चौगाव) यांचा आमदार भदाणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब देसले, विद्याधर पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. छोटू मासुळे, भय्यासाहेब मासुळे, नानाभाऊ वाघ, युवराज जाधव यांनी संयोजन केले. -- शिक्षकांवरील कारवाईचा धुळ्यात निषेध व्यक्त धुळे : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर व खुलताबाद तालुक्यांतील एक हजार ८६ प्राथमिक शिक्षकांची तीन वर्षांची वेतनवाढ रोखण्याच्या जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारवाईचा धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने निषेध केला. या निर्णयाविरोधात आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिक्षकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. मुख्यालयी वास्तव्याबाबत दिलेल्या खुलाशावर समाधान न झाल्याने ११ सप्टेंबरला शिक्षणाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. या निषेध आंदोलनात जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बापू पारधी यांच्यासह राजेंद्र पाटील, एकनाथ भामरे, मनोज निकम, चुनिलाल अहिरे, प्रभाकर रायते, गोकुळ सोनार, सुभाष पगारे, शालीग्राम सैंदाणे, कैलास ईशी, संदीप पाटील, रामचंद्र भलकारे, भूपेंद्र राजपूत, रामचंद्र वाघ, अनिल सोनवणे, जितेंद्र राजपूत, ज्ञानेश्वर धनगर, हेमराज पवार, प्रमोद सोनवणे, अनिल नहिरे, गोपाल लोहार, रामदास राजपूत, कविता फटकाळ, रत्ना पाटील, रुपाली पाटील, हेमराज शिंदे, मनोज मोरे, महेंद्र पाटील, अरूण खैरनार, आनंदा हालोरे, विश्वास बागूल सहभागी झाले होते. ------------- (दोन कॉलम घेणे) हस्ती स्कूलमध्ये हिंदी सप्ताह धुळे, ता. २१ : दोंडाईचास्थित हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, हस्ती वर्ल्ड स्कूल आणि हस्ती गुरुकुल दाऊळ शिवार येथे हिंदी दिनानिमित्त आंतरशालेय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. हिंदी साहित्यकांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी हेड बॉय, हेड गर्ल, खानदेश कवयित्री लतिका चौधरी, परीक्षक नंदकिशोर भावसार, बीओडी सदस्य प्रवीण गोस्वामी, पीटीए सदस्य दीपाली गिरासे आणि सर्व प्राचार्य, समन्वयक उपस्थित होते. तासिकेदरम्यान सुलेखन, कथाकथन, मुहावरे अर्थ व वाक्यप्रयोग, कहानी-लेखन, चित्रलेखन, जाहिरात व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. वादविवाद स्पर्धेत अ गटात रोशन जैन प्रथम, वैदही चौधरी द्वितीय, रुचिता पाटील तृतीय, तनवी भदाणे, उत्तेजनार्थ तर ब गटात अर्पिता इंदानी प्रथम, कार्तिकी पाटील द्वितीय, सांची जैन तृतीय, आकांक्षा अग्रवाल उत्तेजनार्थ यांनी यश मिळविले. स्वरचित काव्यगायन स्पर्धेत अ गटात रुचिता पाटील प्रथम, नित्या गोसावी द्वितीय, शौर्य घरटे तृतीय, कृष्णा गिरासे उत्तेजनार्थ तर ब गटात दुर्वा गुजराथी प्रथम, जान्हवी लाहोटी द्वितीय, जैनाब बोहरी तृतीय, सांची जैन उत्तेजनार्थ यांनी पारितोषिके मिळविली. यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हिंदी विभागप्रमुख मनोज ठाकूर, संजय मोरे, कविता पावरा, शीतल पाटील, रेखा वाघ, प्रवीण माळी, सावंत साळुंखे, मयुरी सोनवणे, वैष्णवी पाटील, समिना सैय्यद यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS U19: ज्युनियर सेहवाग अर्धशतकापासून हुकला, अन्वय द्रविड्हचीही बॅट शांत; यशवर्धन चौहानने मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं शतक

Walchandnagar News : बुलेटच्या सायलेन्सर वरुन फिरविला रोलर....; पोलिसांनी बुलेटचा फट् -फट् आवाज केला बंद...

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

SCROLL FOR NEXT