नाशिक

बारामती, तळसंदे महाविद्यालयांचे संघ विजयी

CD
पान चार ॲंकर ---------- 30228 नाशिकः संदीप फाउंडेशन येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन बास्‍केटबॉल स्‍पर्धेतील विजेता ठरलेला तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयांचा संघ. समवेत उपस्‍थित मान्‍यवर -- बारामती, तळसंदे महाविद्यालयांचे संघ विजयी संदीप फाउंडेशन कृषी महाविद्यालयात बास्केटबॉल स्पर्धा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन संदीप फाउंडेशन कृषी महाविद्यालयात केले होते. संदीप फाउंडेशनच्या क्रीडा संकुलात ही स्‍पर्धा झाली. मुलांमध्ये बारामतीचे डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, तर मुलींच्‍या गटात तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय संघाने विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी मा. डॉ. व्ही. आर. आवारी, क्रीडा मंडळाचे प्रतिनिधी शरद पाटील, संदीप फाउंडेशनचे डॉ. विवेक निकम, संदीप विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. डी. डी. शिंदे, प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर, डॉ. पी. एस. कचरे, डॉ. बी. डी.भाकरे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. परेश रेगे, निरीक्षक प्रा. एस. एस. निरगुडे आदी उपस्थित होते. डॉ. संदीप झा म्‍हणाले, की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाईल. डॉ.आवारी यांनी महाविद्यालयाचे कौतुक करताना उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने स्पर्धेचे आयोजन केल्‍याचे नमूद केले. या स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न एकूण ३० महाविद्यालयांपैकी १४ मुलांच्या आणि १४ मुलींच्या संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील सर्व सामने अत्यंत चुरशीचे आणि रोमांचक झाले. मुलांच्‍या गटातून बारामतीच्‍या डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. पुण्यातील कृषी महाविद्यालय संघ द्वितीय, कोल्‍हापूरच्‍या शासकीय कृषी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्‍या गटात तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालय द्वितीय, तर जैनापूरचे कृषी महाविद्यालय तृतीय स्‍थानी होते. विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिके, चषक व प्रमाणपत्रे प्रदान केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावनी निकम हिने केले. आभार प्रा. परमेश्वरी पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. महेश रत्नपारखी, प्रा. स्नेहल सोनवणे, डॉ. शिवकुमार वरारकर आदींनी परीश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS U19: ज्युनियर सेहवाग अर्धशतकापासून हुकला, अन्वय द्रविड्हचीही बॅट शांत; यशवर्धन चौहानने मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं शतक

Walchandnagar News : बुलेटच्या सायलेन्सर वरुन फिरविला रोलर....; पोलिसांनी बुलेटचा फट् -फट् आवाज केला बंद...

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

SCROLL FOR NEXT