नाशिक

शाश्वत स्वच्छतेसाठी स्वयंशिस्तीची गरज -अवर मुख्य सचिव पराग जैन

CD
(टुडे पान एक मेन लिड) NSK26H30244/ NSK26H30250 नंदुरबार : रामपूर (ता. शहादा) येथे कंपोस्ट खड्डा भरताना पराग जैन, नमन गोयल, शेखर रौदळ आदी. दुसऱ्या छायाचित्रात घाटली येथे पारंपरिक शिबली नृत्य करताना नमन गोयल. --- स्वच्छतेची स्वयंशिस्त विकसित भारताचा पाया पराग जैन ः जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांची पाहणी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २१ : विकसित भारताचे स्वप्न २०४७ पर्यंत साकार करण्यासाठी स्वच्छतेसारख्या मूलभूत सवयीत शाश्वतता आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने स्वयंमशिस्त अंगीकारावी. सेवा संकल्प अभियान, स्वच्छता अभियानात सरपंच, पदाधिकारी यांनी आपले शंभर टक्के योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अवर मुख्य सचिव पराग जैन यांनी केले. ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत रामपूर (ता. शहादा) येथे आयोजित ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी जैन नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी शहादा तालुक्यातील रामपूर, दरा, तसेच अक्राणी तालुक्यातील घाटली, काकरदा या गावांना भेटी दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, स्वच्छ भारत मिशनचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक गणेश मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय पाटील, शहादा गटविकास अधिकारी महेश पोतदार, सहायक गटविकास विकास राठोड, गटविकास अधिकारी पूजा गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी संगीता नाईक, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता महेंद्र नाईक, राहुल गिरासे, शाखा अभियंता, विस्तारधिकारी आदी उपस्थित होते. या वेळी ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. रामपूर येथे पराग जैन, नमन गोयल, शेखर रौंदळ यांच्या उपस्थितीत कंपोस्ट खड्डा कसा भरावा, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. त्यानंतर ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत रामपूर, दरा व घाटली येथे वृक्षारोपण करण्यात आले. रामपूर येथे कचरा विलगीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली. दरा येथे पाणीपुरवठा योजनेच्या कामांसह शालेय शौचालयाची पाहणी केली. घाटली येथे ग्रामस्थांनी आदिवासी नृत्यासह पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत केले. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सौरऊर्जेवरील दुहेरी नळपाणी पुरवठा योजनेसह सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनांतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली. कार्यक्रमास रामपूर सरपंच भारती वाघ, उपसरपंच नर्मदा पावरा, ग्रामपंचायत अधिकारी मनीषा माळी, विरपूरच्या सरपंच वसंतीबाई राहासे, उपसरपंच धर्मसिंग पवार, ग्रामपंचायत अधिकारी सुधीर वाघ, घाटलीचे सरपंच दीत्या वळवी, ग्रामपंचायत अधिकारी भरत निकुंभे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT