फोटो - NSK26H30243
(यातून कुंभदूतचा लोगो घ्यावा)
नाशिकच्या रेडिओ मिरचीतर्फे
उद्या फ्रंटलाइन वर्कर्सचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२१ : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्सच्या योगदानाला सलाम करण्यासाठी रेडिओ मिरची ९८.३ नाशिकतर्फे ‘मिर्ची कुंभदूत २०२६’ या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता. २३) सायंकाळी सहाला गोविंदनगर येथील ट्रीट हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
‘नाशिकच्या खऱ्या नायकांना मानाचा मुजरा!’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात सफाई कर्मचारी, पोलिस, अग्निशमन दलाचे जवान, आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन सेवा कर्मचारी, ऑटोरिक्षाचालक तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्सचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार आहे. तसेच सामाजिक, व्यावसायिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रात योगदान देणाऱ्या संस्था आणि संघटनांना ‘कुंभ स्मृतीचिन्ह’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महापौर हिमगौरी आडके-आहेर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमहापौर विलास शिंदे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र सानप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नाशिक महानगरपालिका, नाशिक उन्नत अभियान आणि नाशिक-त्र्यंबक कुंभमेळा प्राधिकरणाचे सहकार्य लाभले आहे. सावनी हेरिटेज हे टायटल स्पॉन्सर, तर फ्रावशी स्कूल्स हे प्रेझेंटेड बाय आहेत. द ॲव्हेन्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ट्रीट हॉटेल, कॉर्पोरेट मशीन आणि ॲड्सवाला हे विविध भागीदार म्हणून या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.