नाशिक

नव्या पिढीचे पालकत्व अवघड पण अशक्य नाही - ओंकार दाभाडकर

CD
NSK26H30242 जळगाव : रोटरी जळगाव वेस्टतर्फे आयोजित व्याख्यानात बोलताना ओंकार दाभाडकर. --- चुकीच्या पालकत्वामुळे तणाव सहन न करणारी पिढी (उपशीर्षक) ओंकार दाभाडकर : रोटरी वेस्टतर्फे ''काय ही आजकालची मुलं''वर व्याख्यान सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २१ : नवीन पिढी अर्थात जेन- झीचे पालकत्व अवघड आहे, पण अशक्य नाही. चुकीच्या पालकत्वामुळे तणाव सहन न करू शकणारी नाजूक पिढी घडली आहे, असे युवा वक्ते मानसशास्त्र अभ्यासक व इन्स्फुएन्सर ओंकार दाभाडकर (डोंबिवली) यांनी केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे ''काय ही आजकालची मुलं!'' या विषयावर मायादेवीनगरातील रोटरी भवन येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष योगेश राका, मानद सचिव बिपिन काबरा, पब्लिक मीटिंग कमिटी चेअरमन चेतन गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. दाभाडकर यांनी दोन पिढ्यांमध्ये फरक खूप मोठा आहे ही समस्या आहे. मात्र चर्चा नव्हे तर त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. सॉफ्ट पेरंटिंगच्या नावाने होणारे लाड टोकाला गेले आहेत. पालक मुलांमध्ये स्वतःचे जीवन पाहत असतात. दुसरीकडे बिझी आहे, म्हणून वेळ नाही अशी सबब सांगतात. चौकट ते तुझ्या भविष्यासाठी... तुला आवडत नाही, तर तू करू नको, मुलांना प्रेमाने हसत खेळत समजून सांगावे; यापेक्षा मी सांगतो आहे. ते तुझ्या भविष्यासाठी तुला करावेच लागेल, असे पालकांनी सांगण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT