नाशिक

जिल्ह्यात २९ ला रोजगार महाकुंभचे आयोजन

CD
जिल्ह्यात २९ ला ‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन मंगेश वाघ : सहा तालुक्यात ९ ठिकाणी होणार मेळावे सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २२ : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे जिल्ह्यातील युवक- युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात मंगळवारी (ता. २९) रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी दिली. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी (धडगाव) आणि नवापूर या सर्व ६ तालुक्यांमध्ये मिळून एकूण ९ ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार आहे. या रोजगार महाकुंभाचा मुख्य उद्देश अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी, पदवीधर, पदविकाधारक (डप्लोमा), आयटीआय उत्तीर्ण तसेच अनुभवी बेरोजगार युवक- युवतींना नामांकित कंपन्या आणि उद्योगांमध्ये थेट रोजगाराची संधी मिळणार आहे. या रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उद्योजक, कंपन्या व आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. -------------------------- तालुकानिहाय मेळावे नंदुरबार तालुका : गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नंदुरबार, जिजामाता एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग, वाघोदे. नंदुरबार शहादा तालुका : शहादा तालुका को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी विकास मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, शहादा, पूज्य साने गुरुजी खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणखेडा. अक्कलकुवा तालुका : संत जगनाडे महाराज शिक्षण मंडळ संचलित श्री बापूसाहेब व्ही. सी. चौधरी महाविद्यालय, खापर, कालिकामाता मंदिर ट्रस्ट, अक्कलकुवा. तळोदा तालुका : अध्यापक शिक्षक मंडळ सी. एस. चौधरी आर्ट्स, एस. जी. पटेल कॉमर्स ॲन्ड बाबाजी बी. जे. पटेल सायन्स कॉलेज, तळोदा. अक्राणी तालुका : आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराज ज. पो. वळवी कला, वाणिज्य आणि वि. कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय. अक्राणी. नवापूर तालुका : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs JPN : मोठा वाद! श्रेयस अय्यर भांडला, अम्पायरने निर्णय बदलला; तसं नसतं झालं तर जिंकला असता जपान, नेमकं काय घडलं ?

आता फक्त Call-SMSचा प्लान, कंपन्यांना बंधनकारक; रिचार्ज होणार स्वस्त, TRAIचा मोठा निर्णय

बाप्पाचं दर्शन घेतलं अन् आठवणीने मागितली ती गोष्ट; दर्शनासाठी गेलेल्या शाहरुख खानच्या त्या कृतीने जिंकली मनं; नेटकरी फिदा

Mark Wood Retirement: दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; ३६ व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

दुष्काळाची अधिसूचना शनिवारपर्यंत, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT