फोटो घ्यावा ः कर्मवीर भाऊराव पाटील
--
शिक्षण गंगेचे भगीरथ : कर्मवीर भाऊराव पाटील
---
(लीड)
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती २२ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते. अण्णांनी लावलेले ज्ञानाचे रोपटे आज वटवृक्ष बनले असून, त्यामागील त्यांचा संघर्ष आणि विचार प्रेरणादायी आहेत.
- माजी प्राचार्य काशिनाथ बागूल, ‘रयत''चे माजी विद्यार्थी, धुळे
---
सांगली जिल्ह्यातील काळे (कुंभोज) येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिक्षणाचा पाया रचला. ‘रयत’ शब्द मराठी संस्कृतीचा जिव्हाळ्याचा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राज्याला ‘रयतेचे राज्य’ म्हटले गेले. रयत म्हणजेच सर्वसामान्य जनता. शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन समाज आणि गोरगरिबांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी गावोगावी शाळा सुरू केल्या.
तत्वनिष्ठ शिक्षण महर्षी
अण्णांचे कार्य सर्व जाती-धर्मांसाठी होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी पुढे चालवला. सत्यशोधक समाजाच्या विचारांवर आधारित मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांनी संस्था चालवली. स्वतःच्या कमाईचा पैसा रयतेच्या शिक्षणासाठी खर्च करताना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही मोडले. अण्णांचे गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
कमवा आणि शिका
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अण्णांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ ला कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथे झाला, तर मूळ गाव वाळवा तालुक्यातील एतळू बुद्रुक होते. कमवा आणि शिका, तसेच स्वावलंबी शिक्षण हे त्यांचे मुख्य धोरण होते. विद्यार्थ्यांसोबत काम करणे, त्यांच्या पंगतीत जेवणे आणि वसतिगृहातील विद्यार्थी आजारी पडल्यास स्वतः रात्रीचा जागरण करून सेवा करणे, यामुळे अण्णा विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘आई’ ठरले होते.
विस्तार आणि योजना
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी साताऱ्यात अण्णांच्या संस्थांना भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता आणि हरिजन सेवक फंडातून मदत पाठविली होती. महात्मा गांधींच्या स्मरणार्थ नगर जिल्ह्यातील आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे सुरू झाला. विशेष म्हणजे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील आणि राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार या संस्थेचे माजी विद्यार्थी किंवा अध्यक्ष म्हणून लाभले. अण्णांच्या या अद्वितीय कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’, तर पुणे विद्यापीठाने ‘डी.लिट’ पदवीने सन्मानित केले. त्यांचा ९ मे १९५९ ला स्वर्गवास झाला. आज रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो शाळा, महाविद्यालय व वसतिगृहे महाराष्ट्रात कार्यरत असून, लाखो विद्यार्थी ज्ञानर्जन करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.