नाशिक

महाराष्ट्र समाज सेवा संघाचा उद्या वर्धापन दिन कार्यक्रम

CD
महाराष्ट्र समाज सेवा संघाचा उद्या वर्धापन दिन कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : महाराष्ट्र समाज सेवा संघाचा ६६ वा वर्धापन दिन बुधवारी (ता. २३) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा येथील विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळेत साजरा होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर साळी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पेटको प्रिसिजन कॉम्पोनंट प्रा. लि.चे प्रमुख रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. १९६० मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेच्या दहा शैक्षणिक शाखा कार्यरत आहेत. त्यात रचना, नवरचना विद्यालय, माई लेले श्रवण विकास विद्यालय, रावसाहेब ओक औद्योगिक संस्था आणि नवरचना इंग्लिश मीडियम स्कूल यांचा समावेश आहे. संस्थेने १९९९ मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वाघेरा येथे आश्रमशाळा सुरू केली. या शाळेला यंदा २७ वर्षे पूर्ण झाली असून, पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधांसह आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकामही नुकतेच पूर्ण झाले आहे. आदिवासी संस्कृतीचा अभ्यास आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधता यावा, या उद्देशाने यंदाचा वर्धापन दिन आश्रमशाळेत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने आश्रमशाळेच्या बांधकामासाठी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर साळी यांच्या पत्नी कमलिनी साळी यांनी दिलेल्या सुमारे २५ लाख रुपयांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या गुळस्कर सभागृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच संस्थेचे माजी विद्यार्थी व कार्यकारिणी सदस्य कौस्तुभ मेहता यांच्या प्रयत्नांतून कै. विजया भागवत यांच्या स्मरणार्थ भागवत कुटुंबीयांनी आश्रमशाळेच्या बांधकामासाठी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष सुधाकर साळी, उपाध्यक्षा हेमलता पटवर्धन, सचिव पंकज पवार, सहसचिव नीलेश ठाकूर आणि कोषाध्यक्ष निरंजन ओक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT