नाशिक

दूध फेडरेशन रेल्वे गेट २४ तास बंद

CD
दूध फेडरेशन रेल्वे गेट २४ तास बंद यार्ड पुनर्रचना कामासाठी २३, २४ ला वाहतूक बंद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २१ : सुरत रेल्वे मार्गावरील जळगाव येथील गेट क्रमांक १४८, अर्थात दूध फेडरेशन गेट, रेल्वे यार्डच्या पुनर्रचनेच्या कामासाठी तब्बल २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी (ता. २३) सकाळी ११ वाजता हे गेट बंद करण्यात येणार असून, गुरूवारी (ता.२४) सकाळी ११ वाजेपर्यंत ते बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गाचा नियमित वापर करणाऱ्या नागरिकांना या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. जळगाव रेल्वेस्थानक परिसरातील रेल्वे यार्डच्या पुनर्रचनेचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये अभियांत्रिकी तसेच रेल्वे परिचालनाशी संबंधित विविध कामे केली जाणार आहेत. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने गेट क्रमांक १४८ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील नियमित वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजीनगरकडून येणारी वाहतूक तसेच निमखेडी रोड, शहरातून छत्रपती शिवाजी नगरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना पर्यायी मार्गाने जावे लागणार आहे. चौकट पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन दूध फेडरेशन गेटचा वापर जळगाव शहरातील नागरिक, वाहनधारक तसेच परिसरातील रहिवासी मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे अचानक होणारी गैरसोय टाळण्यासाठी संबंधितांनी गेट बंद राहण्याच्या कालावधीची नोंद घ्यावी, असे रेल्वे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे. तसेच रिंगरोड मार्गावरील पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलावरून किंवा टॉवर चौक मार्गे छत्रपती शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पूल हे पर्यायी मार्ग वाहनचालक व नागरिकांनी याचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे विभागाकडून केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT