नाशिक

३१ हजारांहून अधिक अथर्वशीर्ष मंत्रांचे पठण ए. टी. झांबरे विद्यालयात विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

CD
NSK26H30255 (फोटो मोठा वापरावा) जळगाव : ए. टी. झांबरे विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी गणरायाचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून ३१ हजार अथर्वशीर्ष मंत्रांचे पठण ए. टी. झांबरे विद्यालयात उपक्रम; पंचामृत अभिषेकाने परिसर भक्तिमय सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२१ : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त गणपती अथर्वशीर्ष पठण व पंचामृत अभिषेकाचा भक्तिमय सोहळा उत्साहात झाला. विद्यार्थी, पालक, माता-पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमात ३१ हजारांहून अधिक अथर्वशीर्ष मंत्रांचे पठण करण्यात आले. दुपारी तीनला सुरू झालेल्या या कार्यक्रमात विद्यालयातील जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी २१ आवर्तनांमध्ये अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले. विद्यार्थ्यांच्या एकसुरातील मंत्रोच्चाराने संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला. सामूहिक पठणामुळे विद्यार्थ्यांना शिस्त, एकाग्रता आणि सामूहिक प्रार्थनेचा अनुभव मिळाला. या वेळी विद्यार्थी व शिक्षकांनी घरून आणलेल्या पाच गणेशमूर्तींचा विधिवत पंचामृत अभिषेक करण्यात आला. एका बाजूला अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण सुरू असताना दुसरीकडे गणरायावर पंचामृत अभिषेक करण्यात आला. मंत्रोच्चार आणि अभिषेकामुळे वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली होती. कार्यक्रमाच्या बैठक व्यवस्था व नियोजनासाठी डी. ए. पाटील, बी. डी. झोपे, सी. बी. कोळी, रोहिणी पाटील, वेदप्रकाश गडदे (आर्य सर), पराग राणे, किशोर भोई आणि निराशा सोनवणे यांनी परिश्रम घेतले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी झाला. चौकट आध्यात्मिक मूल्यांची जोपासना विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, आध्यात्मिक मूल्ये व गणेशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. पालक व माता-पालकांनीही सहभागी होत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanteras Gold Rate: धनत्रयोदशीला सोन्याच्या भावात मोठी घसरण! खरेदीदारांना दिलासा; जाणून घ्या सोनं-चांदीचा ताजा भाव

Indian Railways: रेल्वेगाड्यांचा सुपरफास्ट दर्जा काढला; १८ गाड्यांचा समावेश; एक जानेवारीपासून बदल, व बदल, दर होणार कमी

Latest Marathi News Update : धुळ्याहून कोल्हापूरला निघालेल्या बसचा साताऱ्यात अपघात, १२ पोलीस प्रशिक्षणार्थी जखमी

UPI वर पैसे स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांना झटका? मोदी सरकार म्हणते, कायम मोफत सेवेचे आश्वासन दिलेच नव्हते... सुप्रीम कोर्टात काय घडलं?

मुश्रीफांची फाईल बंद का केली? ईडीने PMLA कोर्टात काय सांगितलं, समोर आली माहिती

SCROLL FOR NEXT