नाशिक

ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकेथॉन

CD
ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ ऑक्टोबरला ‘वॉकेथॉन’ ------------------------------------- ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘वॉक फॉर स्वास्थ्यम’ उपक्रम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतुलित, निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे सलग दुसऱ्या वर्षी ‘वॉक फॉर स्वास्थ्यम’ या वॉकेथॉन उपक्रमाचे रविवारी (ता. ४ ऑक्टोबर) आयोजन करण्यात आले आहे. वय वर्षे ५० आणि त्यापुढील वयोगटाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत नि:शुल्क ‘वॉकेथॉन’ होणार आहे. ‘वॉकेथॉन’ सकाळ प्रस्तुत ‘स्वास्थ्यम’ उपक्रमाचाच एक भाग आहे. वॉकेथॉनमध्ये २.५ किलोमीटर अंतर असणार आहे. सर्व सहभागींसाठी झुंबा, हास्ययोग व लकी ड्रॉ असे अनेक उपक्रम असणार आहेत. इन्फो... अशी करा नोंदणी... ‘वॉकेथॉन’मध्ये सहभागी होण्यासाठी शरद धात्रक (मो. ९८९०० १११२०) यांच्याकडे आपली व्यक्तिगत आणि ग्रुप नोंदणी करू शकता. ज्येष्ठ नागरिक संघ, हास्य क्लब आणि इतर सहयोगी संस्थांकडून सदस्य असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची समूहाने नोंदणी करण्यात येणार असून, त्यांना व्यक्तिगत नोंदणीची आवश्यकता नाही. ‘वॉकेथॉन’ उपक्रमात नाशिक उपनगरातील ज्येष्ठ नागरिक संघांनाही सहभागी होता येणार आहे. इन्फो... वॉकेथॉन : केव्हा आणि कोठे? तारीख : रविवार, ४ ऑक्टोबर वेळ : सकाळी ७ ते ९ स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव व समर्थ जॉगिंग ट्रॅक, आकाशवाणी टॉवर मैदान, गंगापूर रोड, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT