नाशिक

हजार जण सहभागी

CD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 30257 धुळे : राष्ट्र भाषा भवनात ‘शाळा- शिक्षण वाचवा मंच’तर्फे झालेल्या बैठकीला उपस्थित शिक्षक, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते. -- ‘शाळा वाचवा’साठी शिक्षक संघटीत -- मुंबई धरणे आंदोलन; धुळे जिल्ह्यातून हजार जण सहभागी -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २१ : ‘शाळा वाचवा- शिक्षण वाचवा’ मंचतर्फे शिक्षण क्षेत्रातील विविध गंभीर प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पाच ऑक्टोबरला मुंबई येथे होणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनात धुळे जिल्ह्यातून एक हजार शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. राष्ट्र भाषा भवनात पार पडलेल्या या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. - आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील पालक, विद्यार्थी, सामाजिक व शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. मंचचे राज्य समन्वयक सिद्धार्थ जगदेव यांनी ‘केजी ते पीजी’पर्यंतच्या (बालवाडी ते पदव्युत्तर) सर्व शैक्षणिक प्रश्नांवर भूमिका मांडली. बैठकीत मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि कृती कार्यक्रम ठरविण्यात आला. त्यानुसार १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, ‘केजी ते पीजी’पर्यंतचे शिक्षण सर्वांना मोफत मिळावे, शाळांचे अनावश्यक विलिनीकरण थांबवावे, शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, विद्यार्थ्यांना दर्जेदार व समान शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, शाळांना आवश्यक पायाभूत सुविधा व पुरेसा निधी द्यावा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याचे प्रकार त्वरित थांबवावेत, अशी मागणी निर्धारित करण्यात आली. - बैठकीत ठरल्यानुसार २५ सप्टेंबरला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मागण्यांसाठी निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर ५ ऑक्टोबरला मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांचा सहभाग असेल. बैठकीत बापू पारधी, भुपेश वाघ, प्रा. भागवत पाटील, आबासाहेब पाटील, उदय तोरवणे, विनोद रोकडे, युसुफ सर, व्ही. टी. गवळे, अशपाक खाटीक आदी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. आंदोलनात अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंचचे राज्य समन्वयक जगदेव, हर्षल मोरे, प्रकाश पाटील, इम्रान खान, अमीन कुरेशी, नीलिमा भामरे, दामोदर पाटील, राजेश शिरुडे, कैलास अमृतकर, नितीन पाटील, ललित ठाकूर, महेश्वर माळी, अजय माळी, मयुरी जाधव, केतन निकम आदींनी केले. -

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT