नाशिक

गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक शाखेतर्फे नियोजन

CD
(कृपया बातमी आवश्‍यक घ्यावी) --- विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक शाखेचे नियोजन बाराव्या दिवशी ४३ मंडळांतर्फे होणार गणेश विसर्जन नंदुरबार, ता. २१ : गणेशोत्सवाच्या १२ व्या दिवशी शहरातील एकूण ४३ खासगी व सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्या वेळी विसर्जनासाठी निघणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात वाहतूक शाखेतर्फे विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीचा प्रमुख मार्ग फुले पुतळा, भद्रा चौक, चिराग अली, मशीद इलाही चौक, फडके चौक, जळका बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दोशहा तकिया, दादा गणपती, देसाईपुरा, मोठा मारुती असा निश्चित करण्यात आला आहे. तसेच काही गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक काकाचा ढाबा, गांधी पुतळा, नेहरू पुतळा, पालिका चौक या मार्गाने मार्गस्थ होणार आहे. तसेच शहरातील मानाचे बाबा गणपती, दादा गणपती, माळीवाड्याचा राजा गणपती मित्रमंडळ, श्रीराम सेनेचा राजा गणपती मित्रमंडळ यांच्यासह शहरातील एकूण ४३ खासगी व सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तीची १२व्या दिवशी विसर्जन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी नंदुरबार शहर वाहतूक शाखेकडून विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनांतर्गत नवापूर चौफुली, फुले पुतळा, सातपीर गल्ली, जळका बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दोशहा तकिया, दादा गणपती, देसाईपुरा-मोठा मारुती, अंधारे चौक, नेहरू पुतळा, गांधी पुतळा आणि महाराष्ट्र व्यायामशाळा या महत्त्वाच्या ठिकाणी तात्पुरते बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. मिरवणूक मार्गावर शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार आवश्यक त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. नागरिक व वाहनधारकांनी विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत मिरवणूक मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. मिरवणूक मार्गावर वाहने उभी करू नयेत, वाहतूक पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शनाचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि वाहनधारकांनी नंदुरबार शहर वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नंदुरबार शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT