ॲंकर
NSK26H30264
जळगाव : पोलिस दलाला नव्या ‘बोलेरो निओ’ वाहने लोकार्पण करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे आदी.
-----------
पोलिस दलाच्या ताफ्यात १२ नवी वाहने दाखल
पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; पाच वर्षांत ३०१ वाहनांसाठी साडेअकरा कोटी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २१ : जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेचे दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या १२ नवीन महिंद्रा बोलेरो निओ श्रेणीतील चारचाकी वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज येथील पोलिस आयुक्तालयातील आवारात करण्यात आले.
आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, रेल्वे पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार, राहुल गायकवाड, मोटार परिवहन विभाग अधिकारी प्रवीण तायडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नव्या वाहनांमुळे पोलिस ठाण्यांची नियमित गस्त, बंदोबस्त तसेच आपत्कालीन प्रसंगी घटनास्थळी तातडीने पोहोचण्यास मदत होणार आहे. २०२६-२७ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागासाठी एकूण १४ नवीन चारचाकी वाहनांना १ कोटी ४४ लाख २९ हजार २७८ रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी जळगाव पोलिस विभागासाठी १० तसेच चाळीसगाव व भुसावळ लोहमार्ग पोलिसांसाठी प्रत्येकी एक अशा १२ वाहनांचे आज लोकार्पण करण्यात आले. या १२ वाहनांची प्रत्यक्ष खरेदी किंमत १ कोटी १६ लाख १६ हजार रुपये आहे. उर्वरित दोन वाहने बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकासाठी आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक धिवरे म्हणाले, की नव्या वाहनांमुळे पेट्रोलिंग, बंदोबस्त तसेच तातडीच्या घटनांना प्रतिसाद देण्याची क्षमता वाढणार आहे.
चौकट
वाहन व्यवस्था बळकटीकरणावर भर
पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतून पोलिस विभागाच्या वाहन व्यवस्थेच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत ११३ चारचाकी आणि १८८ दुचाकी अशी एकूण ३०१ वाहने पोलिस विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी ११ कोटी ५२ लाख ३१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.