धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर
--
फोटो क्रमांक ः 30267....विलास शिंदे
--
कृषी उद्योजक शिंदे यांना मानाचा पुरस्कार
-
माजी मंत्री रोहिदास पाटील स्मृतीदिनानिमित्त २७ ला धुळ्यात सोहळा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २१ : माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त रविवारी (ता. २७) येथे अभिवादन व पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. देवपूरमधील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या राज्यस्तरीय सोहळ्यासाठी माजी आमदार कुणाल पाटील, अश्विनी पाटील यांच्या हस्ते स्तंभरोहण विधीवत पार पडले.
सोहळ्याला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील प्रमुख पाहुणे असतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अध्यक्षस्थानी असतील. उत्तर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आजी- माजी खासदार, आमदारांची उपस्थिती असेल.
-
शिंदे यांना पुरस्कार
राष्ट्रीय पातळीवरील कृषी क्षेत्रातील नामांकित उद्योजक तथा नाशिकच्या सह्याद्री फार्म्स कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांना यंदाचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. शेतकऱ्यांना एकत्र करून सहकाराच्या माध्यमातून जगात ४० हून अधिक देशांत कृषी उत्पादनांची निर्यात करणाऱ्या त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान दिला जात असल्याचे माजी आमदार पाटील यांनी जाहीर केले. गेल्या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांना प्रदान करण्यात आला होता. स्तंभरोहणावेळी लताताई रोहिदास पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, भगवान करनकाळ, डॉ. दरबारसिंग गिरासे, युवराज करनकाळ, हर्षवर्धन दहिते, धरती देवरे, शामकांत सनेर, संजय शर्मा, अतुल सोनवणे, चंद्रकांत सोनार, बाजीराव पाटील, विलास देवरे, रायबा पाटील, संग्राम शिंदे, वैभवी दुसाणे, डॉ. निशा महाजन, कमलेश देवरे, विरेंद्रसिंग गिरासे, निवृत्त न्या. जे. टी. देसले आदी उपस्थित होते.
-