नाशिक

देवरगाव ग्रामस्थ पाण्यासाठी त्रस्त

CD
जलजीवनची नळयोजना रखडली; देवरगावकरांचा उपोषणाचा इशारा आठ-आठ दिवसांनी पाणी; शाळा, अंगणवाडीतील बालकांनाही पाणीटंचाईचा फटका सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२१ : जलजीवन मिशनअंतर्गत देवरगाव (ता. नाशिक) येथील पाणीपुरवठा योजनेचे काम २०२४-२५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापही अपूर्ण आहे. काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराविरोधात तक्रारी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. येत्या ३० दिवसांत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले. देवरगावसह शेरपाडा, वैष्णवनगर, घाबाईवस्ती, शिवशक्तीनगर, प्राथमिक शाळा आणि आळंदी वस्तीला या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या या भागात आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी मिळत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील बालकांनाही पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. या समस्येबाबत १४ ऑगस्ट रोजी संबंधित ठेकेदार दत्तात्रय नागरे व मनोज नागरे यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सरपंच पार्वता पिंपळके व उपसरपंच सुरेश मोंढे यांनी सांगितले. त्यामुळे योजनेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा ३० दिवसांनंतर जिल्हा परिषदेसमोर सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: दिवसभरात काय घडलं? वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT