नाशिक

मिरवणूक चालली तब्बल आठ तास

CD
पाळधीची विसर्जन मिरवणूक चालली तब्बल आठ तास सकाळ वृत्तसेवा पाळधी (ता. धरणगाव), ता. २१ : येथील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल आठ तास चालली. शेवटच्या गणपतीचे विसर्जन रात्री दोनला झाले. या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर प्रताप पाटील व विक्रम पाटील यांनी मिरवणुकीतील प्रत्येक मंडळात आपला सहभाग नोंदवला. येथे नेहमी प्रमाणे सातव्या दिवशी गणपतीचे विसर्जन करण्यात येते. ही विसर्जन मिरवणूक पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द या दोन्ही गावात वेग वेगळी निघते. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सर्व गणेश मंडळ श्रीराम मंदिराजवळ जमून तेथून मिरवणुकीला सुरुवात होते. या वेळी शिस्तबद्ध पद्धतीने व सर्व मंडळ एकाच रांगेत मिरवणुकीत सहभागी होत असतात. मात्र या वेळी ही परंपरा खंडित झाली. पाळधी बुद्रुक गावात ढोल ताशांच्या गजरात तर पाळधी खुर्द गावात डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. या वेळी गुलालाची उधळणही मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. या मिरवणुकीत प्रताप पाटील व विक्रम पाटील यांनी प्रत्येक मंडळात जाऊन ठेका धरून आपला सहभाग नोंदवला. या वेळी चोपडा भागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, धरणगावचे पोलिस निरीक्षक उमाकांत गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक गणेश कोते यांच्यासह पाळधी व धरणगावचे पोलिस, दंगा नियंत्रक पथक, होमगार्ड यांच्यासह तब्बल १२५ कर्मचारी यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT