नाशिक

मोराचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

CD
NHI26A00290 नशिराबाद (ता. जळगाव) : विहिरीतून बाहेर काढलेल्या मोरासह तरुण. ----------------------------------------------------------------- विहिरीतून सुटका केलेल्या मोराचा उपचारादरम्यान मृत्यू सकाळ वृत्तसेवा नशिराबाद (ता. जळगाव), ता. २१ : येथील पार्श्वनाथ पेट्रोल पंपासमोरील एका निर्जन विहिरीत पडलेल्या मोराला तरुणांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान मोराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १९) रात्री उघडकीस आली. शनिवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास शेतातील विहिरीत मोर पडल्याची माहिती मिळाल्याने नशिराबादच्या तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुपेश महाजन अंधाऱ्या विहिरीत उतरल्यानंतर मोर जिवंत असल्याचे लक्षात येताच त्याला कवेत घेऊन बाहेर काढले. या बचावकार्यात नीलेश माळी, रुपेश माळी, घनश्याम महाजन, चंदू पाटील, कल्पेश चौधरी व प्रतीक महाजन यांनी मदत केली. मोराची सुटका केल्यानंतर तरुणांनी नगराध्यक्ष योगेश पाटील यांना सांगितले. नगराध्यक्षांनी वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, वन विभागाचे पथक वेळेवर पोहोचू न शकल्याने नगराध्यक्ष पाटील यांनी वाहनातून मोराला जळगावच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केल्याने मोराने हालचाल करीत उपचाराला प्रतिसाद दिल्याने तो वाचेल, अशी आशा होती. मात्र, रात्री अकराच्या सुमारास उपचारादरम्यान मोराचा मृत्यू झाला. काही वेळापूर्वीच मृत्यूच्या दारातून बाहेर काढलेल्या या मुक्या पक्षाचा डोळ्यांदेखत मृत्यू झाल्याने बचाव करणाऱ्या तरुणांना अश्रू अनावर झाले. रात्रीच्या वेळी जीवाची पर्वा न करता मोराचा प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या या तरुणांच्या संवेदनशीलतेचे व धाडसाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT