नाशिक

विसर्जन मिरवणुकीला शिस्तीचे बंधन

CD
टुडे चार : मेन फिचर NSK26H30296 जळगाव : विसर्जन मिरवणुकीच्या बैठकीला उपस्थित जिल्हा पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, महापालिका आयुक्त आदित्य जिवने आदी. --- विसर्जन मिरवणुकीला शिस्तीचे बंधन पहिल्या दहा मंडळांना थेट प्रवेश; उशीर करणाऱ्यांना शेवटचा क्रमांक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत आणि वेळेत पार पाडण्यासाठी यंदा सार्वजनिक गणेश मंडळांवर विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांना केवळ दोन वाहनांनाच परवानगी देण्यात येणार असून, ठरलेल्या वेळेत मिरवणूक सुरू न करणाऱ्या मंडळाचा क्रमांक बदलून त्याला शेवटच्या क्रमांकावर पाठविण्यात येणार आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीत डिजे लावण्यास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मिरवणुकीदरम्यान अडथळा न आणता नंतर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी जिल्हा पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, महापालिका आयुक्त आदित्य जिवने, पोलिस निरीक्षक विशाल जैस्वाल, सागर शिंपी, उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक उपायुक्त समीर बोरोले यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. रात्रीपासूनच रांग विसर्जन मिरवणुकीत महापालिकेच्या मानाच्या गणपतीला प्रथम स्थान असेल. त्यानंतर पहिल्या दहा मंडळांना स्वतंत्र क्रमांकाची आवश्यकता राहणार नसून त्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. उर्वरित मंडळांनी रात्री बारापासून आपले वाहन मिरवणुकीच्या रांगेत लावायचे असून, त्यानुसार क्रमांक निश्चित केला जाणार आहे. मंडळांना दिलेल्या वेळेत मिरवणूक सुरू करणे बंधनकारक आहे. विलंब झाल्यास संबंधित मंडळाला मूळ क्रमांकावरून वगळून शेवटच्या क्रमांकावर पाठविले जाईल. स्वागत व्यासपीठ अडथळामुक्त हवे मिरवणुकीदरम्यान विविध संस्थांकडून मंडळांचे स्वागत केले जाते. मात्र रस्त्यावर पुढे उभारण्यात येणाऱ्या स्वागत व्यासपीठांमुळे मिरवणुकीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे यंदा अशी व्यासपीठे रस्त्याच्या मागील बाजूस उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चौकट बैठकीनंतर प्रवेशद्वारावर वाद बैठक शांततेत पार पडल्यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ काही माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद वाढून संबंधित एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT