नाशिक

ब्राह्मण समाजातर्फे लेफ्टनन कर्नल ऋषिकेश मिश्रा यांचा सत्कार

CD
NSK26H30307 जळगाव : उत्तर भारतीय ब्राह्मण समाज संस्थेतर्फे लेफ्टनन कर्नल ऋषिकेश मिश्रा यांचा सत्कार करताना महापौर दीपमाला काळे, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष ओम त्रिवेदी, संस्था अध्यक्ष मोहन तिवारी, गोविंद तिवारी आदी. ---- लेफ्टनन कर्नल मिश्रा यांचा ब्राह्मण समाजातर्फे सत्कार उत्तर भारतीय ब्राह्मण समाज संस्थेतर्फे कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : तब्बल अकरा वेळा अपयश आले, तरी प्रयत्नांची साथ न सोडता बाराव्या प्रयत्नात यश संपादन करणारे लेफ्टनन कर्नल ऋषिकेश मिश्रा यांचा येथील उत्तर भारतीय ब्राह्मण समाज संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. मोहाडी रोडवरील हटकर समाज मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. या वेळी महापौर दीपमाला काळे, पोलिस उपअधीक्षक नितीन गणपुरे, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष ओम त्रिवेदी यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना ऋषिकेश मिश्रा यांनी आपल्या यशामागे आई-वडिलांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. यशाचा प्रवास संघर्षमय होता. वारंवार आलेल्या अपयशानंतरही जिद्द आणि सातत्य कायम ठेवले. अखेर बाराव्या प्रयत्नात मिळालेले यश हे प्रयत्नांना मिळालेल्या फळाचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष मोहन तिवारी यांनी कर्तृत्ववान युवकाचा गौरव करणे ही समाजासाठी अभिमानाची बाब असून, मिश्रा यांचा संघर्ष विद्यार्थी व युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संजय शुक्ला, गोविंद तिवारी, सुरेंद्र मिश्रा, यशवंत मिश्रा, रोहित तिवारी, राहुल अवस्थी, मिलिंद तिवारी, तुषार मिश्रा, दिनेश बाजपई, पंडित दुबे, लवकुश दुबे यांच्यासह पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. यशस्वितेसाठी भूषण तिवारी, शुभम तिवारी, दुष्यंत तिवारी, किशोर तिवारी, स्नेह दुबे, अक्षय दुबे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांचा सहभाग

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT