नाशिक

सोने– चांदी दर

CD
सोन्या-चांदीच्या भावात घसरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ ः सुवर्ण बाजारातात आठवड्याच्‍या पहिल्‍याच दिवशी सोमवारी (ता. २१) भावात मोठी घसरण झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारीही (ता. २२) सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली. यामुळे दागिने खरेदीची संधी खरेदीदारांसाठी निर्माण झाली आहे. चांदी तीन हजारांनी स्‍वस्‍त सोमवारी बाजार सुरू झाल्‍यानंतर सोन्याचा भाव एक लाख ५३ हजार रुपयांवर (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. त्यात हजार रुपयांची घसरण होऊन सोने एक लाख ५२ हजार रुपयांवर आले होते. मंगळवारी (ता. २२) पुन्‍हा एक हजार रुपयांची घसरण होऊन सोन्‍याचे भाव एक लाख ५१ हजार रुपयांवर आले आहेत. चांदीत तीन हजार रुपयांची घसरण होऊन चांदी दोन लाख ३५ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्‍या बदलाचा परिणाम सोन्या-चांदीच्या बाजारात होत असल्‍याचे चित्र आहे. सुवर्ण बाजारात सातत्‍याने सुरू असलेला चढ-उतार कायम आहे. गेल्‍या आठवड्यात भावात काहीशी वाढ झाली होती. दरम्‍यान, पुढील आठवड्यात पितृपक्ष सुरू होत आहे. यामुळे दागिन्यांची फारशी खरेदी होत नाही. यामुळे भाव कमी होत असल्‍याचे चित्र दर वर्षी पाहावयास मिळते. यापूर्वीच सलग दोन दिवसांपासून भाव कमी होऊ लागले आहेत. --- चौकट सोन्या-चांदीचे भाव (विनाजीएसटी) तारीख--- सोने (प्रतिदहा ग्रॅम)--- चांदी (प्रतिकिलो) १६ सप्‍टेंबर--- १ लाख ५१ हजार ५००--- २ लाख ३४ हजार १७ सप्‍टेंबर--- १ लाख ५० हजार ५००--- २ लाख ३२ हजार १८ सप्‍टेंबर--- १ लाख ५२ हजार ५००--- २ लाख ४१ हजार १९ सप्‍टेंबर--- १ लाख ५३ हजार--- २ लाख ४१ हजार २१ सप्टेंबर--- १ लाख ५२ हजार--- २ लाख ३८ हजार २२ सप्टेंबर--- १ लाख ५१ हजार--- २ लाख ३५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : IIT मुंबईच्या गेटबाहेर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; साहिल वाकोडे आत्महत्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT