पेंडिंग बातमी..... २० तारखेला पाठवली होती
AM526A09474
अमळनेर : महावितरणच्या विविध प्रश्नांसंबंधी सुरू असलेल्या उपोषणस्थळी महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करताना प्रवीण पाटील आदी.
नवीन वीज मीटरच्या विरोधात
अमळनेरला ग्राहकाचे उपोषण
सकाळ वृत्तसेवा
अमळनेर, ता. २२ ः महावितरणकडून नवीन वीज मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना येणाऱ्या भरमसाठ व अवाजवी वीज बिलांच्या चौकशीसाठी शिवसेनेच्या युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रवीण पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात गुरूवारपासून (ता. १७) बेमुदत उपोषण सुरु केले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रवीण पाटील यांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
या संदर्भात वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना उपोषणकर्ते प्रवीण पाटील यांनी निवेदन दिले आहे. नवीन मीटर बसवल्यानंतर प्रत्यक्षातील वीज वापराच्या तुलनेत अतिशय जास्त रकमेची बिले येत असून एका चहा विक्रेत्याला तब्बल २१ हजारांचे बिल आल्याचे निवेदनात नमूद केले आहे. नागरिकांवर अनावश्यकपणे नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जाऊ नये. सदोष मीटरची तत्काळ तपासणी करून चुकीच्या पद्धतीने आकारलेली रक्कम समायोजित करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, महावितरणच्या अभियंत्यांनी प्रवीण पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी शिवसेनेचे जयेश चव्हाण, अजय पवार, प्रकाश पाटील, प्रदीप देशमुख, अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबडकर, सहायक अभियंता हेमंत सैदाने, सहायक लेखापाल योगेश बोरसे, सहायक अभियंता मोहन नेवाडे आदी उपस्थित होते.
-------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.