नाशिक

अद्वैत बलसाने, वेद वानखेडेकर यांची महाराष्ट्र संघात निवड

CD
फोटो : NSK26H30336 नंदुरबार : अद्वैत बलसाने, वेद वानखेडकर यांचा गौरव करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी. -------------------------- अद्वैत बलसाने, वेद वानखेडेकर यांची महाराष्ट्र संघात निवड नंदुरबार, ता. २३ : येथील नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू अद्वैत बलसाने व वेद वानखेडकर या दोन्ही खेळाडूंनी टेनिस क्रिकेट स्टेट चॅम्पियशनशिप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व अहिल्यानगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी सतरा वर्षांआतील मुले व मुली टेनिस क्रिकेट स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे उत्साहात झाली. यामध्ये नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू अद्वैत बलसाने व वेद वानखेडकर यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने ३ ते ७ ऑक्टोबरला राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आठवी सतरा वर्षाआतील राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्तरप्रदेश राज्यातील मथुरा येथे होणार असून, या स्पर्धेसाठी भारतातून २१ राज्यांचा सहभाग नोंदवणार आहेत. या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी अद्वैत बलसाने याची विकेट किपर बॅट्समन आणि वेद वानखेडकर यांची ऑल राऊंडर म्हणून महाराष्ट्र संघामध्ये निवड करण्यात आली आहे. अद्वैत बलसाने, वेद वानखेडकर यांची उत्तरप्रदेश राज्यातील मथुरा येथे होत असलेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. या यशाबद्दल आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते अद्वैत बलसाने, वेद वानखेडकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ चौधरी, चावरा इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक फादर टेनी फरक्का, सचिव संदीप खलाणे, सहसचिव दिनेश महाले, योगेश मोरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT