नाशिक

बंगाली सराफा मजुराच्या पत्नीने घेतला गळफास

CD
सराफा कारागिराच्या पत्नीने घेतला गळफास जुने जळगावातील घटना; पाच महिन्यांपूर्वीच झाले लग्न; आत्महत्येचे कारण अस्पष्ट सकाळ वृासेवा जळगाव, ता.२२ : शहरातील जुने जळगाव तेली गल्ली परिसरात वास्तव्यास असलेल्या सराफा कारागिराच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मृत विवाहितेचे लग्न अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच झालेले असून, नेमक्या कोणत्या कारणासाठी तिने गळफास घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. झिलक तपन मंडल (रा. पश्चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जुने जळगाव परिसरात तेली गल्लीत भाड्याच्या घरात सराफा कारागीर सनाजीत नारायणचंद संत्रा, पत्नी झिलक यांच्यासह वास्तव्यास होते. त्यांचा विवाह अवघ्या पाच महिन्यांपूर्वी झाला होता. विवाहानंतर महिनाभरापूर्वी नवदांपत्य रोजगारासाठी जळगावात आले होते. जळगावच्या सराफ बाजात दागिने घडविण्याच्या दुकानात सनाजित कामाला आहेत. कौटुंबिक कलह रविवारी (ता.२३) सायंकाळी पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर सनाजित हे त्यांच्या मालकाकडे जेवणाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर गेले होते. पती घराबाहेर गेल्यानंतर झिलक हिने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे परिचितांनी माहिती देताना सांगितले. काही तासांपासून खोलीचे दार बंद होते. पती घरी परतल्यावर घडला प्रकार निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच श.िनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौकट पोलिसांकडून कारणांचा शोध झिलक या नवविवाहितेने नेमक्या कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली, या बाबत स्पष्टता नसून परिचितांचे जाबजबाब आणि नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर याचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT