नाशिक

सब जुनियर गट जिल्हा अजिंक्यपद आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा सिद्धिविनायक विद्यालयास विजयाचा दुहेरी मुकुट

CD
शहर टुडे पान तीनसाठी --------------- NSK26H30375 जळगाव : सब जुनिअर जिल्हा अजिंक्यपद आट्यापाट्या स्पर्धेतील विजेत्या सिद्धिविनायक विद्यालयाच्या संघांसोबत नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे, सरस्वती ढाके, विशाल फिरके, अनिल माकडे, देवीदास महाजन, ॲड. अक्षय टेमकर, राहुल चौधरी. ––––––– सब जुनियर आट्यापाट्या स्‍पर्धेत सिद्धिविनायक शाळेस दुहेरी मुकुट सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : सेलू (जि. परभणी) येथे सबज्‍यूनियर गट राज्य अजिंक्यपद आट्यापाट्या स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या जळगाव जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत सिद्धिविनायक विद्यालयाने मुला-मुलींच्‍या दोन्‍ही गटांत विजेतेपद पटकाविले. सबज्‍युनिअर जिल्‍हा आट्यापाट्या स्पर्धेचे उद् घाटन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू डॉ. सुमेध तळवेलकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा आट्यापाट्या संघटनेच्या कार्याध्यक्ष नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे, प्रशांत जगताप, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त विशाल फिरके, राज्य कार्यकारणी सदस्य अनिल माकडे, ॲड. अक्षय टेमकर, सरस्वती ढाके, देवीदास महाजन, राहुल चौधरी, बबलू चव्हाण उपस्थित होते. स्‍पर्धेतील अंतिम सामन्यात मुला-मुलींच्‍या दोन्‍ही गटांतून झि. तो. माध्यमिक विद्यालय धानोरा संघाचा पराभव करून विजेतेपदाचा दुहेरी मुकुट संपादन केला आहे, तर श्रीराम माध्यमिक विद्यालय मुले व यशवंत पब्लिक स्कूल वाघळी (ता.चाळीसगाव) येथील संघांना तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत आट्यापाट्याची राष्ट्रीय खेळाडू अमृता पवार, तर मुलांमधून आयुष हैरोळे यांना स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. पंच म्हणून देवेश पाटील, भूपेंद्र भारंबे, दीपेश पाटील, नीलेश पाटील, शुभम चव्हाण, प्रणव बडे, तेजस पाटील, सचिन भंगाळे, नेहा कंगटे, वैष्णवी पाटील यांनी काम पाहिले. आयोजनासाठी रोहित नवले, स्वप्निल महाजन, लीलाधर पाटील, विवेक पाटील, भावेश पाटील, महेश पाटील, साहिल बिडकर, साई वाणी यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT