नाशिक

जाट समाजातर्फे ‘तेजा दशमी उत्सव’

CD
(छायाचित्रे क्रॉप करुन घ्यावी) फोटो : H30374 नाशिकः जाट समाज सेवा समिती ट्रस्‍टतर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपस्‍थित सिंहस्‍थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्‍त शेखर सिंह. समवेत उपस्‍थित समाज बांधव. --- जाट समाजातर्फे ‘तेजा दशमी उत्सव’ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : जाट समाज सेवा समिती ट्रस्टतर्फे सत्यवादी वीर तेजाजी यांच्या तेजा दशमीनिमित्त साईलीला लॉन्स येथे कार्यक्रम झाला. या वेळी भजनसंध्या, भामाशाह सन्मान व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम पार पडले. सिंहस्‍थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्‍त शेखर सिंह यांनी उपस्‍थित राहातांना, समाज बांधवांशी संवाद साधला. आयुक्त शेखर सिंह यांनी सपत्नीक वीर तेजाजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत समाजोन्नतीसाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमात कुंभवाणी गायक कलाकार कुंभाराम गोदारा यांनी भक्तिगीतांचे सादरीकरण केले, तर हरीराम किंवाडा यांनी सूत्रसंचालन केले. त्र्यंबक रोडवरील संदीप विद्यापीठासमोरील जागेवर जाट समाजाचे ‘जाट भवन’ उभारण्यात येत आहे. या भवनाच्या उभारणीसाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून कार्यक्रमादरम्यान समाजबांधवांकडून निधी संकलन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार जाट समाज सेवा समिती ट्रस्टचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी खेताराम खोत, श्रीचंद रणवा, बनेसिंह झाडिया, त्रिलोकाराम कुडी, जैनाराम गुगडवाल, कानाराम गेट, हनुमान बेनीवाल, रामदेव डुडी, मुलतानाराम डुडी, राजेंद्र सिंह पिलानिया, रामकुमार चौधरी, अभयराम कादयान, ब्रिजमोहन चौधरी, कृष्णकुमार बेनीवाल आदींनी परीश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT