सेकंडमेन
शहर टुडे पान तीनसाठी
---------------------
NSK26H30380
जळगाव : रायसोनीनगरात मंगळवारी वॉटर मीटरची पाहणी करताना महापौर दीपमाला काळे.
-----------------
वॉटर मीटरच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
--------
महापौरांनी मागविले थेट प्रात्यक्षिक; रायसोनीनगरात पाहणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : शहरातील विविध भागांत बसविण्यात आलेल्या वॉटर मीटरमुळे पाण्याचा दाब कमी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (ता.२२) प्रभाग क्रमांक १३मधील ऑक्सिजन पार्क व रायसोनीनगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींवर समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने महापौरांनी संबंधित कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. शिवाय पुढील आठवड्यात महापौर व महापालिका आयुक्तांसमोर मीटरची संपूर्ण कार्यपद्धती प्रत्यक्ष दाखविण्याचे निर्देश दिले.
रायसोनीनगरात नागरिकांशी संवाद साधताना, ‘मीटर बसविण्यापूर्वी घरात मुबलक व दाबाने पाणी येत होते. मात्र, मीटर बसविल्यानंतर पाण्याचा प्रवाह कमी झाला, अशी तक्रार नागरिकांनी केली. त्यावर महापौरांनी कर्मचाऱ्यांना मीटरमधून पाणी सोडून प्रत्यक्ष दाखविण्यास सांगितले. मात्र, अपेक्षित प्रात्यक्षिक दाखविता न आल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, मीटरची प्रत्यक्ष कार्यपद्धती व त्यामागील यंत्रणेबाबत महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नसल्याचेही पाहणीत समोर आले. कर्मचाऱ्यांकडे तक्रार नोंदवही उपलब्ध नसणे, असलेले नोंदवहीचे कामकाज अव्यवस्थित असल्याचे आढळले. यावरही महापौरांनी संबंधितांना सूचना केल्या. यावेळी भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेविका सुरेखा तायडे, अधिकारी योगेश वाणी, कर्मचारी जितेंद्र पाटील, करण जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
बिलिंग स्पष्टतेच्या सूचना
घराबाहेरील मीटर शक्य असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावेत, प्रत्येक मीटरला संरक्षक पेटी बसवावी, गटारी अथवा अडचणीच्या ठिकाणी आवश्यक आकाराच्या विशेष पेट्या तयार कराव्यात, अशा सूचना महापौरांनी दिल्या. मीटरच्या बिलिंग पद्धतीबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती देण्यासह बसविताना वापरण्यात येणाऱ्या जोडणी साहित्याचा दर्जा चांगला ठेवण्याचे निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.