नाशिक

विसर्जनाच्या तोंडावर रस्त्याची दुरवस्था

CD
ॲंकर शहर टुडे पान तीनसाठी ------------------- NSK26H30382 जळगाव : गणेश मूर्ती विसर्जन मार्गाची मंगळवारी पाहणी करताना महापौर दीपमाला काळे, महापालिकेतील गटनेते प्रकाश बालाणी आदी. ------ विसर्जनाच्या तोंडावर रस्त्याची दुरवस्था -------- महापौरांची मक्तेदाराला तंबी; तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : अनंत चतुर्दशी अवघ्या तीन दिवसांवर असताना गणेश मूर्ती विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे व रस्त्यावर पसरलेली खडी महापालिका प्रशासनाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित करणारी ठरली. प्रभाग क्रमांक १५मधील सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गाची महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (ता.२२) सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधित मक्तेदाराला दूरध्वनीवरूनच जाब विचारला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविक, गणेश मंडळांचे कार्यकर्ते व वाहनधारकांची मोठी वर्दळ या मार्गावर राहणार आहे. अशास्थितीत रस्त्यावरील खड्डे व मोठ्या प्रमाणात सांडलेली खडी अपघाताला निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे महापौरांनी पाहणीवेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत माहिती घेतली. रस्त्याची कामे वेळेत पूर्ण न झाल्याबद्दल महापौरांनी संबंधित मक्तेदाराला स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. बुधवारी (ता.२३) सकाळपर्यंत मार्गावरील सर्व खड्डे बुजलेले दिसले पाहिजेत. रस्त्यावर सांडलेली खडीही तातडीने हटवून मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, महापालिका अभियंता योगेश वाणी, सेवा मंडळाचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते. मार्ग सुरक्षितेसाठी उपायोजना करा विसर्जन मिरवणुकीपूर्वी मार्ग सुरक्षित व अडथळामुक्त करण्याच्यादृष्टीने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असेही महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले. गणेश मंडळांना विसर्जनासाठी येताना कोणताही त्रास होऊ नये, गर्दीच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: गौतमी पाटीलने घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT