फोटो -
मालेगाव कॅम्प : येथे ब्रेन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे उदघाटन करताना चंद्रकांत शेवाळे, जिभाऊ कुवर, किसन चंदन, अरुण सैंदाणे, सौरभ चंदन आदी.
''ब्रेन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’चे
मालेगाव कॅम्प येथे उदघाटन
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव कॅम्प,ता.२२ : विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत असलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या मालेगाव कॅम्प शाखेचा उद्घाटन सोहळा शनिवारी (ता.१२) शिवप्रसाद कॉम्प्लेक्स, कॉलेज स्टॉप, मालेगाव कॅम्प येथे उत्साहात संपन्न झाला. त्यामध्ये मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन,ॲबॅकस, वैदिक मॅथ व डी.एम.आय. टी असे चार प्रकारचे अभ्यासक्रम एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या कार्यक्रमात मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन कोर्सचा २ विद्यार्थ्यांचा डेमो देण्यात आला. त्यामध्ये डोळ्यांना पट्टी बांधून मुले रंग, शब्दांचे वाचन, व्यक्ती ओळखणे, विविध कार्ड व सुगंध डोळे बंद करून अचूकपणे ओळखतात. यातून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व एकाग्रता साधण्यास मदत होते. हिशेबाची अचूक आकडेमोल वैदिक मॅथद्वारे केली जाते.
डी.एम.आय.टी तंत्रज्ञानातून बोटांच्या ठशावरून ४० पानाचा रिपोर्ट तयार केला जातो. मुलांची बुद्धिमत्ता, स्वभाव, गुण कौशल्य, अभ्यासाची गती व करीअर कुठे करायचे ते यातून समजते. इंग्रजीतील योग्य संवाद कौशल्य फोनिक्स मधून शिकवण्याचे काम ब्रेन डेव्हलपमेंट सेंटर येथे सुरू करण्यात आले आहे. मालेगावच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बौद्धिक विकासाची नवी दिशा निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे,” असा विश्वास संस्थेच्या संचालक,प्रा.अरुण सैंदाणे व प्रा. सौरभ चंदन यांनी व्यक्त केला. या उदघाटन प्रसंगी उपस्थित कृ.उ.बा.समिती मा.सभापती,चंद्रकांत शेवाळे, देवयानी इन्स्टिट्यूट धुळे, संस्थापक, देवयानी महाले, जीभाऊ कुवर, प्राचार्य, रविंद्र शेवाळे, महेंद्र शेवाळे, निवृत्त प्राचार्य,के.डी.चंदन, शेतकरी,पंडित सैदाणे, ठोके सर,मगरे सर,पाटील सर, चंदन परिवार, माता पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, करिअर समुपदेशक,विनोद चंदन यांनी केले.
फोटो ओळी : मालेगाव कॅम्प
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.