नाशिक

दामदुप्पटच्या आमिषाने महिला वकिलास गंडा

CD
महिला वकिलाची सात लाखांत फसवणूक -------- जळगावात दांत्यासह तिघांवर गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या रकमेवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिला वकिलाची सात लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात पती-पत्नी व आईविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील रामदास कॉलनीतील ॲड. तोषिता ज्ञानेश्वर भिरुड (वय ५३) यांचे शेजारी अतुल भास्कर पाटील, जयश्री अतुल पाटील व सुरेखा भास्कर पाटील ऊर्फ प्रीती दिलीप पाटील (सर्व रा. बांभोरी, ता. धरणगाव) यांची जुनी ओळख होती. जानेवारी २०२५मध्ये संशयितांनी शेअर मार्केटच्या व्यवसायात मोठा नफा मिळवून देण्याचे सांगून भिरूड कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. ॲड. तोषिता भिरूड व त्यांच्या मुलाने ऑनलाईन संशयितांच्या बँक खात्यात लाखो रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला काही महिने नियमित परतावा देऊन संशयितांनी अधिक रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. धनादेश न वटणे अन् धमकी मार्च २०२६पासून संशयितांनी परतावा देणे पूर्णपणे बंद केले. भिरूड यांना संशयितांनी दिलेले धनादेश बँकेत वटले नाहीत. त्यानंतर संशयितने रक्कम परत न करता स्वतः व त्याच्या बायकोच्या नावे गुंतवणूक केली. पैसे परत मागितल्यास खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकीही दिली. सात लाखांत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ॲड. तोषिता भिरूड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अतुल, जयश्री व सुरेखा पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक अशोक वारुंगसे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT