नाशिक

वीज चोरीप्रकरणी गुन्हे

CD
धुळे ः टुडे १ साठी -- तीन तालुक्यांत अनधिकृत वीजवापर - महावितरणकडून वीज चोरीप्रकरणी सहा जणांवर गुन्हे - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून वीज चोरीविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. निजामपूर व सोनगीर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले. छावडी (ता. साक्री) येथे तपासणी केली असता उज्ज्वला धनुरे यांनी वीज मीटरच्या सर्व्हिस वायरला टॅपिंग करून हॉटेलसाठी ५५ हजार ३२० रुपयांची वीज चोरी केल्याचे आढळले. लोणखडी (ता. साक्री) येथे पूर्वमुखी एलटी लाईनच्या पोलवरून थेट आकडा टाकून लांब सर्व्हिस वायरच्या साहाय्याने दुकानांसाठी वीज वापरल्याचे तपासणीत समोर आले. याप्रकरणी गोपाल आनंदसिंग राजपूत यांच्याकडे नऊ हजार ४१० रुपये, जितेश संतोष साळवे व विवेक देविदास अहिरे यांच्याकडे प्रत्येकी आठ हजार ९०० रुपये, तर दरबारसिंग नारायणसिंग गिरासे यांच्याकडे आठ हजार ७४० रुपयांची वीजचोरी आढळली. महावितरण कंपनीचे अधिकारी जितेंद्र देवरे यांच्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. मेहेरगाव (ता. धुळे) येथेही वीजचोरीचा प्रकार उघडकीस आला. महावितरण कंपनीचे सहायक अभियंता आशिष कासार यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत शशीकांत दामू भामरे हे मागील सहा महिन्यांपासून दुकानातील उपकरणांसाठी अनधिकृतपणे वीज वापरत असल्याचे आढळले. त्यांच्याकडे ४९ हजार ७०४ रुपयांची वीजचोरी व १५ हजार रुपयांचा तडजोड आकार अशी रक्कम आढळली. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महावितरणकडून थेट आकडा टाकणे, सर्व्हिस वायरला टॅपिंग करणे किंवा अन्य मार्गाने वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT