धुळे : टुडे पान ३ साठी.. अँकर
--
फोटो क्रमांक : 31266
धुळे : सेवा संकल्प अभियानांतर्गत झालेल्या विशेष पेडियाट्रिक सर्जरी कॅम्पमध्ये बालकाची विचारपूस करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे. शेजारी वैद्यकीय अधिकारी.
--
सेवा संकल्प अभियानांतर्गत धुळ्यात आरोग्यासाठी संवाद
--
जिल्हा रुग्णालयाची मोहीम; बालशस्त्रक्रिया, सर्वरोग निदान, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : आरोग्यसेवा रुग्णालयाच्या चार भिंतींत न थांबता थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावी, आजार होण्यापूर्वी जनजागृती व्हावी आणि गरज पडल्यास तपासणीपासून उपचारापर्यंत मदतीचा हात मिळावा, या भूमिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ विविध आरोग्य व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. शहर, ग्रामीण भाग, शाळा, वृद्धाश्रम आणि विविध संस्थांपर्यंत हे उपक्रम पोहोचवल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रविंद्र सोनवणे यांनी दिली.
-
केवळ आरोग्य तपासणीपुरते हे अभियान मर्यादित न ठेवता, एचआयव्ही/एड्स जनजागृती, सर्वरोग निदान, बालरोग उपचार, पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती, स्त्री-पुरुष समानता, मुलींच्या जन्मदराविषयी संवेदनशीलता, ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध विषयांना एकत्र जोडण्यात आले. आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे एका व्यापक सामाजिक दृष्टीकोनातून पाहण्याचा यशस्वी प्रयत्न या अभियानांतर्गत करण्यात आल्याचे डॉ. सोनवणे यांनी नमूद केले.
-
जनजागृती कार्यशाळा
अभियानात पोलिस अधीक्षक कार्यालयात एचआयव्ही/ एड्सविषयी विशेष जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. यात संसर्गाचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय, शासकीय आरोग्यसेवा आणि आजाराबाबतचे गैरसमज दूर करण्यावर भर देण्यात आला. शिरुड (ता. धुळे) येथे झालेल्या सर्वरोग निदान शिबिरात गावकऱ्यांची तपासणी करून त्यांना योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन व उपचार देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत शिंदखेडा येथील जनता हायस्कूलमध्ये वृक्षारोपणासह शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाचा उपक्रम राबविला गेला. विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संधी, स्पर्धा परीक्षा, करिअर निवड आणि कौशल्य विकासाविषयी माहिती देण्यात आली. याशिवाय, नगाव येथील वृद्धाश्रम व दिव्यांग पुनर्वसन केंद्रात विशेष आरोग्य शिबिर घेत ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना आवश्यक औषधोपचार पुरविण्यात आले.
-
१४-१
..चौकट..
१४-१
विशेष शबिरातून मार्गदर्शन
या अभियानात आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन शिबिर घेत वाढत्या वयातील आजार प्रतिबंध आणि नियमित तपासणीचे महत्त्व सांगण्यात आले. बालकांसाठी तनमाई मुक्ताई मेमोरियल मेडिकल कॉलेज येथे एक ते तीन ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष ‘पेडियाट्रिक सर्जरी कॅम्प’ पार पडला, ज्यामध्ये तपासणीत आवश्यकता आढळलेल्या ० ते १८ वयोगटातील बालकांवर आवश्यक बालशस्त्रक्रिया करण्यात आल्या. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या माध्यमातूनही धुळ्यात विविध विशेष आरोग्य शिबिरे सुरू असून, याद्वारे नेत्ररोग, दंतरोग, स्त्रीरोग आणि बालरोगांची तपासणी केली जात आहे. वैयक्तिक आरोग्यासोबतच स्वच्छ परिसर, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारा हा प्रवास ‘सेवा संकल्प अभियानाला’ वेगळी ओळख मिळवून देत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.