नाशिक

सप्तश्रृंगी गडासाठीच्या ‘एसटी’ मार्ग बदल

CD
सप्तश्रृंग गड यात्रेसाठी बसचा मार्ग बदलला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय : ९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान नवे नियोजन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : सप्तश्रृंग गड यात्रेनिमित्त नवीन सीबीएस (ठक्कर) बसस्थानकावरून दररोज सुटणाऱ्या २५० जादा एसटी बसमुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बसचा मार्ग बदलला आहे. ९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान हा सुधारित मार्ग तात्पुरत्या स्वरूपात लागू राहणार असून, वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी याबाबत सुधारित अधिसूचना जारी केली. नवरात्रोत्सव व सप्तश्रृंग गड यात्रेच्या काळात गडासाठी दररोज सुमारे २५० जादा बस सोडण्यात येणार आहेत. पूर्वीच्या मार्गावरील त्र्यंबक नाका, खडकाळी सिग्नल, सारडा सर्कल, मदिना चौक, मुंबई नाका व द्वारका परिसरात आधीच वाहतुकीचा ताण असल्याने जादा बसमुळे कोंडी होण्याची शक्यता होती. एसटी महामंडळाच्या विनंतीनंतर वाहतूक पोलिसांनी हा बदल केला आहे. या मार्गावरील बदलांची एसटी चालक व संबंधित कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे. असा असेल सुधारित मार्ग सीबीएस ते सप्तश्रृंग गड : नवीन सीबीएस (ठक्कर) बसस्थानक-मेहेर सिग्नल-अशोकस्तंभ-रविवार कारंजा-पंचवटी कारंजा-दिंडोरी नाका-सप्तश्रृंग गड. सप्तश्रृंग गड ते सीबीएस : दिंडोरी नाका-पंचवटी कारंजा-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-शालीमार-खडकाळी सिग्नल-त्र्यंबक नाका सिग्नल-नवीन सीबीएस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar : नानाची वाडी झाली सुन्न! सिंहगडाच्या मातीत रमलेला, आणि येथेच विसावला; ग्रामस्थांची भावना

IndiGo Winter Schedule : प्रवाशांना मोठा झटका! बेळगाव-दिल्ली विमानसेवेला 'विंटर' ब्रेक; इंडिगो कंपनीकडून सेवांमध्ये बदल, आता आठवड्यातून तीनच उड्डाणे

Dhruv Rathee Bengaluru Protest : ध्रुव राठी पहिल्यांदाच उतरला रस्त्यावर! बंगळूरमध्ये SIR विरोधात आंदोलन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, मोदींवरही सडकून टीका

Latest Marathi News Live Update: अंत्यसंस्कारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे पोहोचले

Viral Picture : डेल टेक्नॉलॉजीजच्या संस्थापकाच्या पत्नीला सोशल मीडियावर केले ट्रोल; संपत्ती वाचून डोळे पांढरे होतील..!?

SCROLL FOR NEXT