धुळे ः टुडे ३ साठी
--
सूचना ः गरजेनुसार बातमी घेणे किंवा शिल्लक ठेवावी
--
जि. प. सेवाविषयक
प्रकरणांना कालमर्यादा
सोमवारचा एक तास राखीव
किंवा
सेवाविषयक प्रकरणांना कालमर्यादा
जि. प. कर्मचाऱ्यांना दिलासा; सोमवारचा एक तास राखीव
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ९ ः जिल्हा परिषदांमधील वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी ग्रामविकास विभागाने ५ ऑक्टोबरला नवे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दर सोमवारी दुपारच्या सत्रात एक तास कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक अर्ज स्वीकारण्यासाठी राखून ठेवावा. प्राप्त अर्जांवर विहित कालावधीत कार्यवाही करून निर्णयाची माहिती अर्जदाराला लेखी द्यावी.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दरमहा सेवाविषयक प्रकरणांचा आढावा घ्यावा. विभागीय आयुक्तांच्या अधिकारातील प्रकरणे स्पष्ट अभिप्रायासह १५ दिवसांत विभागीय आयुक्तांकडे पाठवावीत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिकारातील प्रकरणांवर कारणमीमांसेसह सविस्तर आदेश देऊन, त्याविरुद्ध १५ दिवसांत अपील करता येईल, अशी तरतूद करावी. विभागीय आयुक्तांनी प्राप्त अपिलांवर ४५ दिवसांत निर्णय घ्यावा. सेवाविषयक प्रकरणे शासनाकडे पाठविण्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्तांनी आपापल्या स्तरावरच निकाली काढावीत, असे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सेवाविषयक प्रश्नांच्या निवारणासाठी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा मार्ग स्वीकारण्याची वेळ येऊ नये, यासाठी ही कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.