नाशिक

नाशिकमध्ये ‘टॉर्च मार्च’ आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

CD
एसआयआरविरोधातील टॉर्च मार्चपूर्वीच आंदोलकांना ताब्यात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; अशोकस्तंभ येथे सरकारवाडा पोलिसांची कारवाई नाशिक, ता. १० : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेमुळे मतदानाच्या हक्कावर निर्माण झालेला धोका आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या अभावाचा निषेध करण्यासाठी काढण्यात येणारा टॉर्च मार्च सुरू होण्यापूर्वीच सरकारवाडा पोलिसांनी विविध सामाजिक, राजकीय व विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांना शनिवारी (ता. १०) सायंकाळी ताब्यात घेतले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह त्यांच्यावर कारवाई करून अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. देशभरात एसआयआर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात आंदोलने सुरू आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शनिवारी सायंकाळी पाचला अशोकस्तंभ येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत टॉर्च मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनचे तल्हा शेख, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश महासचिव समाधान बागुल, स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाचे राहूल गायकवाड, प्राजक्ता कापडणे, कैवल्य चंद्रात्रे, छात्रभारतीचे राज्य सदस्य राज माळी, अनुजा तिकांडे, सीजेपीचे कार्तिकेश बोरसे, मुकेश झणके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मार्च सुरू होत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेले. या वेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध केला. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. NCTY26B61045 नाशिक : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी टॉर्च मार्च काढताना नाशिककर. फोटो : H31911 नाशिक : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी अशोकस्तंभ येथून टॉर्च मार्च काढण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेत सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेताना पोलिस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्र सरकारच्या बैठकीत निर्णय न झाल्यास कोगनोळी टोल नाक्यावर बेमुदत बंद, राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

Marathi News Live Updates : तब्बल ८ तासांनंतर तुषार गांधी यांची सुटका

Microfinance : मायक्रोफायनान्स क्षेत्रात सुधारणा; कर्जपुरवठ्यात शिस्त आणि तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका

Amazon Great Indian Festival : ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्ट; दीड लाख हंगामी नोकर भरती

WEALTHY ZODIAC SIGNS: जन्मापासूनच श्रीमंतीचं नशीब घेऊन येतात ‘या’ ४ राशींचे लोक; पैशांच्या बाबतीत असतात लकी

SCROLL FOR NEXT