नाशिक

ड्रग्ज तस्करीत लिप्त पोलिसांवर बडतर्फीचे संकट

CD
पान मेन ------------------ अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील निष्काळजीपणा भोवणार पोलिस महासंचालकांकडून महत्त्वपूर्ण निर्देश जारी; वेळप्रसंगी बडतर्फेची कारवाई सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : महाराष्ट्र राज्याला पूर्णपणे अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून कडक निर्देश जारी करण्यात आले आहेत. यात अमली पदार्थ विरोधी कारवाईत दुर्लक्ष किंवा निष्काळजी करणाऱ्या पोलिस अधिकारी किंवा अंमलदारांवर खात्यातून बडतर्फ करण्यापर्यंतची कठोर कारवाई करण्यात येणार आहे. राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी शनिवारी (ता. १०) हे परिपत्रक संपूर्ण राज्यातील घटकप्रमुख आणि लोहमार्ग पोलिसांना उद्देशून जारी केले आहे. परिपत्रकांत नमूद मुद्दे, निर्देशांमध्ये निष्काळजीपणात दोष असल्यास तातडीने बदली, गुन्ह्यात सहभाग किंवा मदत केल्याचे आढळल्यास खात्यातून बडतर्फी किंवा कठोर कारवाईचा अंतरभाव करण्यात आला आहे. बाह्य यंत्रणेने अमली पदार्थ संबंधित नष्ट केल्यास ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशी कारवाई होईल. त्याबाबत पोलिस अधीक्षक २४ तासांच्या आत चौकशी करतील व संबंधित पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांची तत्काळ बदली करण्यात येईल. -------- थेट बडतर्फीची कारवाई अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांमध्ये पोलिस अधिकारी किंवा अंमलदार यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याबाबत चौकशीत निष्पन्न झाल्यास, त्यांच्याविरुद्ध भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३११ अन्वये खात्यातून काढून टाकणे किंवा बडतर्फ करणे अथवा विभागीय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याबाबतची संयुक्तिक कारवाई केली जाईल. -------- कारवाईची उद्दिष्टे अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरण यामध्ये गुंतलेल्या सर्वांवर प्रभावी कायदेशीर कारवाई करणे, अमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींचे पुनर्वसन करणे आणि अमली पदार्थांच्या सेवनादुष्परिणामांबाबत जनजागृती करणे यावर भर देण्यात आला आहे. पोलिस महासंचालक दाते यांनी हे परिपत्रक जारी केले असून, राज्यातील सर्व पोलिस आयुक्त (लोहमार्ग सह) आणि पोलिस अधीक्षक (लोहमार्ग सह) यांना या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात एक नोव्हेंबर रोजी एकता दौड; ४० हजार नागरिक होणार सहभागी

दाढी-कटींग ते नख कापण्यापर्यंत...! नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्या गोष्टी टाळाव्यात? जाणून घ्या...

Marathi News Live Updates : मुंबईत ताब्यात घेतलेल्या ६०० आंदोलकांची सुटका

FDA Crime : गार्डन वडापाव, रामकृष्‍ण मिल्‍ससह आठ ठिकाणांच्या खाद्यतेलावर कारवाई; पुणे जिल्ह्यात ३४ हजार ४८१ किलो तेल ताब्यात

Jintur News : दुष्काळामुळे पीक जळून गेल्याने आर्थिक विवंचनेत युवा शेतकऱ्याने संपविले जीवन; जिंतूर तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT