नाशिक

राज नगर दुर्गोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी जयश्री सोनार, तर सचिवपदी उज्वला सोनवणे

CD
राजनगर दुर्गोत्सव मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी सोनार, सचिवपदी सोनवणे सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : शहरातील निमखेडी रोड परिसरातील शिवधाम मंदिराजवळील राजनगर महिला मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या आयोजनासाठी राज नगर दुर्गोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी जयश्री सोनार, उपाध्यक्षपदी भारती सूर्यवंशी, खजिनदारपदी निलिमा बच्छाव, सचिवपदी उज्ज्वला सोनवणे, तर सल्लागारपदी मालती मनोहर पाटील यांची निवड करण्यात आली. राज नगर दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या काळात दहा दिवस महिलांसाठी गरबा व दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच लहान मुलांसाठी विविध मनोरंजक खेळ आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून परिसरातील महिला, मुली आणि लहान मुलांना आपली कला व कौशल्ये सादर करण्याची संधी मिळते. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वाढविणे, सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे आणि महिलांचा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमधील सहभाग वाढविणे, हा मंडळाचा उद्देश आहे. यंदाही नवरात्रोत्सव भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात येत असून, राज नगर परिसरातील महिला, पुरुष आणि लहान मुलांसह सर्व नागरिकांचे सहकार्य मंडळाला लाभत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा..

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT