नाशिक

‘अविष्कार’ स्पर्धेत २७६ विद्यार्थ्यांचा सहभाग

CD
पान दोन ॲंकर -------------- 33079 नाशिकः विभागीय आविष्कार स्पर्धेत पारितोषिकप्राप्त विद्यार्थी व यशस्वी संशोधकांसह उपस्‍थित मान्‍यवर. --- आविष्कार स्पर्धेत २७६ विद्यार्थ्यांचा सहभाग सपकाळ औषधनिर्माणशास्‍त्र महाविद्यालयात यशस्‍वी आयोजन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २०ः लोणेरेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्नित आर. जी. सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे विभागीय ‘अविष्कार २०२६’ संशोधन स्पर्धा झाली. या स्पर्धेत नाशिक व जळगाव विभागातील महाविद्यालयांतील एकूण २७६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे हा स्पर्धेचा उद्देश होता. स्‍पर्धेच्‍या उद्‌घाटन कार्यक्रमात प्राचार्या डॉ. दिप्ती फडतरे यांनी प्रास्‍ताविकात रूपरेषा सांगितली. विद्यापीठातर्फे निरीक्षक म्हणून उपस्‍थित डॉ. एस. जी. दाहोत्रे यांनी विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रातील नव्या संधी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, समस्या निराकरणाची क्षमता आणि समाजोपयोगी संशोधनाचे महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सपकाळ यांनी विद्यापीठाकडून नियुक्त निरीक्षक, परीक्षकासह सहभागी विद्यार्थ्यांचे स्‍वागत केले. आपल्या नवकल्पनांद्वारे समाजोपयोगी संशोधन घडावे व ते समाजाच्या व या मातृभूमीच्या कामी यावे अशा सदिच्छा व्यक्त केली. परीक्षक म्‍हणून डॉ. गणेश वरखेडे, डॉ. एस. जी. दाहोत्रे, प्रा. जी. मुधोलकर, डॉ. व्हि. आर. गायकवाड, डॉ. एम. भांगे, डॉ. यु. सुखदेवे, डॉ. पी. गांगुर्डे, डॉ. एस. बी. घोडेराव, डॉ. आर. भवर (रुपवते), डॉ. एन. कुलकर्णी, प्रा. एन. एम. तेजाळे, प्रा. एस. एल. वाघ, डॉ. डी. पवार, डॉ. सी. ए. वैद्य, डॉ. एस. खरे यांनी काम पाहिले. विविध विषयांवर आधारीत प्रत्येक विषयाच्या प्रयोग तथा सादरीकरणाद्वारे विभागीय स्तरावरून एक विजेता व एक उपविजेता अशा दोन स्पर्धकांची निवड करून संबंधीत स्पर्धकांना विद्यापीठ स्तरावरील पुढील फेरीसाठी निवडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कितीही दरोडेखोर आले तरी आमचा भगवा कोणीही चोरू शकत नाही; दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

"आम्हाला पक्षाचे संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदेंना पुन्हा सिंहासनावर बसवायचे आहे"; शिवसेनेच्या नेत्यांचे मोठे विधान!

रामराज्य म्हणजे नेमकं काय? विजयादशमीच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सांगितला अर्थ

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! आधी दुसऱ्या सेलिब्रिटीला संपवण्याचा होता प्लॅन, चौकशीत काय समोर आलं?

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

SCROLL FOR NEXT