नाशिक

एचआयव्ही बाधितांचे जुळले ‘ऋणानुबंध’

CD
एचआयव्ही बाधितांचे जुळले ‘ऋणानुबंध’ दीडशे विवाहोच्छुकांमधून पाच जणांची जुळली रेशीमगाठ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २८ : कर्करोग, टीबी, बीपी, मधुमेह रुग्णांकडे सहानुभूतीने बघितले जाईल पण, एचआयव्ही बाधित असेल तर कपाळावर आठ्या उमटतात. परंतू, गेल्या काही वर्षात सकारात्मक बाब घडली असून आधुनिक उपचार पद्धतींमुळे एचआयव्ही बाधितांचे प्रमाण घटले आहे. ‘ऋणानुबंध’ या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यातून पाच विवाहोच्छुकांची रेशीमगाठ जुळली असून यामध्ये दोन विधवा महिलांना जोडीदार मिळाला. एनएनपी प्लस, एनजीओ फोरम, प्रेम फाउंडेशन, तुळसाई बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व जातीय एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींचा ‘ऋणानुबंध’ राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन रोटरी क्लब हॉल येथे करण्यात आला होता. या मेळाव्यात अहिल्यानगर, नांदेड, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा जिल्ह्यातून १५० विवाहइच्छुक उमेदवारांसह चारशे पालकांनी उपस्थिती लावली. उद्‌घाटन महिला व बाल विकास उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळावा यशस्वितेसाठी राजू शिरसाठ, शोभा काळे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, बाळासाहेब बोडके, महेंद्र मुळे यांनी प्रयत्न केले. ---- चौकट आत्तापर्यंत १२ मेळावे रक्त संक्रमण आणि असुरक्षित लैंगिक संबंधामुळे एचआव्हीची बाधा होत असल्याने याकडे बदनाम आजार म्हणून बघितले जात होते परंतू, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आई, वडील बाधित असले तरी, होणारे बाळ पूर्णपणे निरोगी जन्माला येवू शकते. त्यामुळे बाधित रुग्णांचे लग्न जुळतात, समाजात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आत्तापर्यंत झालेल्या १२ ‘ऋणानुबंध’ राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यातून अनेक रेशीमगाठी जुळल्या असून, एचआयव्ही बाधित आनंददायी, निरोगी आयुष्य जगत आहेत. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Bonus Laws: कायमस्वरूपीच नव्हे, प्रोबेशनवरील कर्मचाऱ्यांनाही मिळू शकतो बोनस! जाणून घ्या नियम

Manoj Jarange Patil: पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणारं उद्घाटन तातडीने रद्द करा; जरांगेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन, भीमाशंकर वृक्षतोड परिसराची केली पाहाणी

Nagpur Graduate Constituency Election : पदवीधरांच्या ढिगभर चुका, १५ हजार मतं बाद; मतदान जनजागृतीचा अभाव

Marathi News Live Updates : मोदी सरकारची मोठी घोषणा; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ

E100 petrol in India : पेट्रोल ७० रुपयांपर्यंत स्वस्त होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता गाड्या चालणार 'E-100' इंधनावर!

SCROLL FOR NEXT