नाशिक

एमबीबीएस, बीडीएसच्या १३८ रिक्त जागांवर प्रवेश संधी

CD
३०-२ एमबीबीएस, बीडीएसच्या १३८ रिक्त जागांवर प्रवेश नोंदणीसाठी आज अखेरची मुदत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ः राज्यातील एमबीबीएस आणि बीडीएस या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेशासाठी रिक्‍त राहिलेल्‍या १३८ जागांसाठी विशेष फेरीचे आयोजन केले आहे. या फेरीसाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणीची सोमवार (ता.२) सायंकाळी साडेपाचपर्यंत मुदत दिली आहे. यासंदर्भात जाहीर वेळापत्रकानुसार राज्य कोट्यातील रिक्त जागांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे. २७ ऑक्टोबरला उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यातील ७० एमबीबीएस महाविद्यालयांमधील एकूण ८ हजार ८१४ पैकी ८ हजार ७३० जागांवर प्रवेश झाले असून ८४ जागा रिक्त आहेत. यामध्ये शासकीय महाविद्यालयांमधील सर्व ५ हजार ०६५ जागांवर प्रवेश झाले आहेत. खासगी महाविद्यालयात ३९, तर खासगी अभिमत विद्यापीठांमध्ये ४५ जागा रिक्त आहेत. बीडीएस अभ्यासक्रमाच्या २९ महाविद्यालयांमधील २ हजार ६१७ पैकी २ हजार ५६३ जागांवर प्रवेश झाले आहेत. ५४ जागा रिक्त असून, यामध्ये शासकीय/महापालिका महाविद्यालयांत २, खासगी महाविद्यालयांत २२ आणि अभिमत विद्यापीठांमध्ये ३० जागा रिक्‍त आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून एकूण १३८ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे. मंगळवार (ता.२) अखेर नोंदणी मुदत असून, याच कालावधीत कागदपत्रे अपलोड करायची आहेत. मंगळवार (ता.३) पर्यंत कागदपत्र पडताळणी करावी लागेल. विविध अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या प्रवेशासाठी पात्र धरले जाणार आहे. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोप पेटलं! फ्रान्सनंतर आता जर्मनीतही ‘Gen Z' च्या आंदोलनाला हिंसक वळण; २७ पोलीस कर्मचारी जखमी, नेमकं काय घडतंय?

Silk farming skill training center : शेतकरी अन् सुशिक्षित तरुणांसाठी मोठी बातमी! रेशीम उद्योगाला गती देण्यासाठी 'या' जिल्ह्यात सुरू होणार विशेष प्रशिक्षण केंद्रे; रोजगाराची सुवर्णसंधी

Mangalwedha Accident: कंटेनरच्या समोरासमोर धडकेत दोन्ही चालकाचा जागीच मृत्यू

Ghodegaon electricity issue: आठ दिवसांपासून वीज गायब; घोडेगावातील ३० हेक्टरवरील पिके करपली

IND vs NZ, T20I: पहिल्या ३ सामन्यांत लय सापडली, पण शेवटच्या २ मध्ये काय बिनसलं? श्रेयस अय्यर म्हणाला, 'एका गोष्टीत सुधारणा हवी...'

SCROLL FOR NEXT