नाशिक

''मुक्‍त'' देणार शिक्षणशास्त्रासाठी तीन प्रतिष्ठित पुरस्कार

CD
१६-१ ''मुक्‍त'' विद्यापीठ देणार तीन प्रतिष्ठित पुरस्कार नाशिक ः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे यंदापासून प्रथमच निवृत्त शिक्षक प्रशिक्षक, कार्यरत शिक्षक प्रशिक्षक व ग्रंथकारांसाठी तीन विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्कारांसाठी पात्र उमेदवारांनी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन विद्यापिठाने केले आहे. विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाच्या मान्यतेने, कुलगुरू प्रा, संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार या पुरस्काराचे आयोजन केले आहे. डॉ. मधुभाई बूच कृतज्ञता पुरस्कार हा शिक्षणशास्त्र क्षेत्रात १ जून २०२५ ते ३१ मे २०२६ या काळात निवृत्त झालेल्या शिक्षक प्रशिक्षकांसाठी आहे. दुसरा पुरस्कार डॉ. रवींद्र. एच. दवे प्रेरणा पुरस्कार हा शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत शिक्षणशास्त्र अध्यापकांसाठी आहे. तिसरा पुरस्कार डॉ. आनंद वास्कर उत्कृष्ट शिक्षण ग्रंथ पुरस्कार या नावाने आहे. या तिन्ही पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे रोख एकवीस हजार, पंधरा हजार व दहा हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. त्यासाठीचे प्रस्ताव ३० नोव्हेंबरपर्यंत ''मा. संचालक, शिक्षणशास्त्र विद्याशाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक'' यांच्या नावे टपालाने, हस्तपोच किंवा dir_edu@ycmou.digitaluniversity.ac या ई-मेलवर पाठवावे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: '२४ तास झाले, आता तरी चर्चेला या!' राहुल गांधींचे मोदींना पुन्हा आव्हान; एपस्टीन प्रकरणही उकरून काढले

Tukaram Mundhe: ''तुम्हाला चांगलं अन्न नकोय का?'' असं का म्हणाले तुकाराम मुंढे? मंत्र्यांना मुंढे का नकोसे वाटतात? दिलं उत्तर...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

MPSC Exam Inquiry: एमपीएससीच्या नऊ परीक्षांची चौकशी; राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ यादीतून वगळल्याने विद्यार्थ्यांचा सवाल

Israel-Iran War: नेतन्याहू यांचा मोठा प्लॅन लीक! इराणला उद्ध्वस्त करण्याचा डाव? चार लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात...

SCROLL FOR NEXT