(अवतीभवती)
श्रॉफ हायस्कूलमध्ये
आज सांंस्कृतिक कार्यक्रम
नंदुरबार : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सोमवारी (ता. ९) पहाटे सहाला शहरातील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल येथे ‘स्वरांगण दिवाळी पहाट’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वर साज म्युझिकल ग्रुप नंदुरबार यांच्याद्वारे हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडकर, समन्वयक नागसेन पेंढारकर यांनी केले आहे.
--------------
एकलव्य हायस्कूलमध्ये
‘स्वरचैतन्य दीपावली पहाट’
नंदुरबार : स्वा. सै. शाहीर हरिभाऊ पाटील सेवाभावी संस्था व लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ८) पहाटे सहाला स्वर चैतन्य दीपावली पहाट कार्यक्रम होणार आहे. नंदुरबार येथील एकलव्य हायस्कूल प्रांगणात हा कार्यक्रम होईल. उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
---------
‘पहाट पाडवा’चा
उद्या कार्यक्रम
नंदुरबार : ‘लायन्स क्लब’ व ‘संकल्प ग्रुप’च्या विद्यमाने मंगळवारी (ता. १०) पहाटे सहाला नंदुरबार येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूलमध्ये पहाट पाडवा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.