नाशिक

गणेशमूर्तींच्या कामात अंतिम टप्प्यातील लगबग

CD
NVL26B01123 नवलनगर : गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवताना विजय चित्ते, सुरेखा शिंदे. ------------- गणेश मंडळ, घरगुती मूर्तींची ७० टक्के नोंदणी नवलनगर, ता. १० : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला अंतिम टप्प्यात वेग आला आहे. यंदा बैलगाडीवरील गणपती, दगडू हलवाई, बाळ गणपती, फेटा व धोतर परिधान केलेल्या मूर्तींना विशेष मागणी असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. तर शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळे व घरगुती गणेशोत्सवासाठी ७० टक्के मूर्तींची नोंदणी झाली आहे. गणेशमूर्ती तयार करण्याचे काम धुळे शहर व ग्रामीण भागातील सुमारे ५० पेक्षा जास्त मूर्तिकारांकडे सुरू आहे. गणेशोत्सवाच्या साधारणतः सहा ते आठ महिने आधीच मूर्तिकार आपापल्या कामाला सुरुवात करतात. मूर्ती तयार करणे, रंगकाम, सजावट आणि अंतिम रूप देणे, अशी कामे घरातील सर्व घटक जबाबदारीने वाटून घेतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी कामाला वेग येतो. नकाणे येथील विजय सुदाम चित्ते व सौ. सुरेखा विजय चित्ते हे दांपत्य गेल्या २० वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करण्याचा व्यवसाय करीत आहेत. यंदा त्यांनी ४५ प्रकारच्या विविध आकारात सहा इंचांपासून तीन फुटांपर्यंतच्या मूर्ती तयार केल्या आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने यंदा मूर्तींच्या किमतीतही वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत साधारणतः २५ ते ३० टक्के दरवाढ झाल्याचे विजय चित्ते, राजेंद्र चित्ते, बापू चव्हाण, रामकृष्ण वाघ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Road Project : रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी! मिरजोळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याचे 24 कोटींतून होणार चौपदरीकरण; असा असणार नवा लूक

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT