सातारणेत रक्तदान
शिबिर उत्साहात
न्याहळोद : लुपिन समूहाचे संस्थापक स्वर्गीय डॉ. देशबंधू गुप्ता यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी ‘सेवा दिवस’ विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन, ग्रामपंचायत सातारणे आणि नवलनगर क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने सातारणे (ता. जि. धुळे) येथे रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास एम. बी. चव्हाण, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी आव्हाड, लुपिन ह्युमन वेल्फेअर ॲन्ड रिसर्च फाउंडेशनचे धुळे व नंदुरबार जिल्हा व्यवस्थापक सुनील सैंदाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिरासाठी वेदांत कुलकर्णी व जीवनज्योती रक्तपेढीच्या पथकाने रक्तसंकलनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. एबीएलई प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक निलेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. नवलनगर क्लस्टरचे व्यवस्थापक गौरव पाटील, रवींद्र देशमुख, तांत्रिक अधिकारी निलेश पाटील, मनोहर काळे, मुकेश शिंदे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.