नाशिक

सारडा सर्कल अतिक्रमण निर्मूलन मोहीमचे

CD
फोटो : A13614 नाशिक : सारडा सर्कल परिसरात राबवण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेनंतर पडून असलेले मातीचे ढिगारे -- अतिक्रमण निर्मूलन मोहिमेनंतर राडारोडा कायम सारडा सर्कल भागात धुळीमुळे वाहनधारकांचे हाल सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. १४ : सारडा सर्कल भागात महापालिकेने राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेनंतर घटनास्थळावर मातीचे ढिगारे आणि मलब्याचे साम्राज्य कायम आहे. वाऱ्यामुळे उडणारी ही माती थेट वाहन चालकांच्या डोळ्यात जात असल्याने या मार्गावरील वाहतूकदार प्रचंड त्रस्त झाले आहेत. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणासाठी सारडा सर्कल ते चित्रकूट कॉर्नर दरम्यान असलेल्या ३७ मोठ्या व्यावसायिक दुकानांचे अतिक्रमण महापालिकेने शनिवारी (ता. ९) काढले. मात्र, मोहिमेनंतर महापालिकेकडून हा मलबा आणि मातीचे ढिगारे उचलण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र आहे. सध्या रस्त्याच्या कडेला असलेले हे मोठे ढिगारे परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय अन्यत्र हलवले आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी आणि त्यांना नव्या जागेची माहिती व्हावी, यासाठी तुटलेल्या दुकानांच्या जागेवरच व्यवसाय इतर ठिकाणी स्थलांतरित केल्याचे माहिती फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. -- भंगार वेचणाऱ्यांची लगबग पाडकामात मोठ्या प्रमाणात लोखंडी मलबा आणि नुकसानग्रस्त साहित्य निघाले आहे. हे साहित्य गोळा करण्यासाठी बुधवारीदेखील भंगार वेचणाऱ्यांची घटनास्थळावर मोठी गर्दी दिसून आली. पाडकामाची मोहीम पूर्ण झाल्याने या भागातील वाहतूक मार्ग आता पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. चित्रकूट चौकास लागून असलेल्या हुड गल्लीतील अतिक्रमणांवरही लवकरच महापालिकेची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. या भागातील अतिक्रमणही लवकरच काढण्यात येईल, असे संकेत महापालिकेने मोहिमेदरम्यान दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? 48 तासांत 3 मोठे निर्णय, 'आरबीआय'नेही दिला इशारा, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

प्रत्येक रंगाची एक किंमत आहे: हिंदी ZEE5 ने लॉन्च केला ‘सतरंगी- बदले का खेल’चा ट्रेलर

Video: सायलीच तन्वी असल्याचं उघड होणार ? नव्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्साह; "आता मालिका योग्य ट्रॅकवर"

Pune Hospital Bomb Scare : पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, 'आरोग्य विभागा'शी काय आहे कनेक्शन?

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

SCROLL FOR NEXT