नाशिक

कुंभमेळा प्राधिकरण बनावट आदेश प्रकरणातील संशयीतास एका दिवसाची पोलीस कोठडी

CD
कुंभमेळा प्राधिकरण बनावट आदेश प्रकरणात संशयितास एक दिवसाची पोलिस कोठडी सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. १४ : नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयुक्तांच्या नावाने कोट्यवधी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेचे बनावट आदेश तयार करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील संशयितास भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यास गुरुवारी (ता. १४) न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयातील सहायक संशोधन अधिकारी तथा सध्या नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले अधिकारी विशाल पाटील यांनी याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संशयित अभिषेक संजय झरे (संचालक व संस्थापक, इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्युशन्स एजन्सी, ठाणे) याच्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. बुधवारी (ता. १३) दुपारी भद्रकाली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक वसंत पवार यांनी न्यायालयाच्या आदेशाने संशयित झरे याचा मध्यवर्ती कारागृहातून ताबा घेतला होता. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. संशयित झरे याने केलेल्या गुन्ह्यात त्याचे आणखी कोणी सहकारी आहेत का, बनावट सही-शिक्का कोठे बनविण्यात आला, बनावट आदेशाचा वापर करण्यात आला का, कुठल्या उद्देशाने हा सर्व प्रकार करण्यात आला, त्याचप्रमाणे आणखी कुठल्या कामांचे अशा प्रकारे बनावट आदेश काढले आहेत का याचीही चौकशी करण्यात येणार आहे. अशा विविध प्रकारची चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडून त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT