नाशिक

शहरात एकाच दिवशी बाल लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना

CD
नाशिक हादरले! एकाच दिवसात तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार मुंबईनाका, अंबड आणि इंदिरानगरमध्ये गुन्हे दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक ता.१५: शहरात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या तीन गंभीर घटना एकाच दिवशी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईनाका, अंबड आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दोन प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार, तर एका प्रकरणात विनयभंग झाल्याचे समोर आले आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणात सूर्यकांत वाघ उर्फ अण्णा याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार विरोधी (पोक्सो) कायदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने २०२२ मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास पीडितेला आणि तिच्या आजीला मारण्याची तसेच कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. अंबड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या दुसऱ्या प्रकरणात निखिल भाऊराव थिटे (वय.२१) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने नात्यातील अल्पवयीन मुलीवर तिच्याच राहत्या घरी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार आहे. तसेच पीडित मुलीने ही बाब कोणाला सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिली. तर इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तिसऱ्या प्रकरणात सुनील कुमार यादव (वय.३६) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने अंधाऱ्या ठिकाणी ओढून नेत तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. पोलिसांनी तात्काळ संशयितास अटक केले. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याच्या गेल्या काही दिवसांपासून अनेक घटना घडल्या आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसातील मुंबई नाका पोलिस ठाण्यात हद्दीतील ही दुसरी घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT