नाशिक

अमली पदार्थांविरोधात रील स्पर्धेचे आयोजन

CD
अमली पदार्थांविरोधात रील स्पर्धेचे आयोजन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिक, विद्यार्थी आणि कंटेंट क्रिएटर्सना कल्पक रील्स तयार करण्याचे आवाहन केले आहे. या स्पर्धेतील पहिल्या तीन उत्कृष्ट रील्सना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार आणि ११ हजार रुपये, तर अन्य १० स्पर्धकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येईल. तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जाईल. रील सादर करण्याची अंतिम मुदत २५ जून रोजी रात्री पावणेबारापर्यंत असून, रील अपलोड करताना (#NashikAgainstNarcotics) हा हॅशटॅग वापरून शहर पोलिसांच्या अधिकृत हँडल्सना टॅग करणे बंधनकारक आहे. अमली पदार्थमुक्त समाज घडवण्यासाठी या मोहिमेत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन पोलिस आयुक्तालयाने केले आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT